आदित्य ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले….

आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी शिंदेंना शुभेच्छा दिल्या. पण ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी मात्र वाढदिवसाच्या दिवशीही शिंदेंवर टीकेची संधी साधलीच.

आदित्य ठाकरे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणाले....
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 11:54 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात साजरा केला. तर आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी चिमटा काढत, शिंदेंना शुभेच्छा दिल्यात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच आनंद साजरा केला. स्वत: फडणवीसांनी त्यांच्या निवासस्थानी जावून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्यात. ठाण्यात मोठ मोठे फे्ल्क्स लावण्यात आले .केक कापले. वर्षा बंगल्यावरही सेलिब्रेशन झालं. तर स्वत: मुख्यमंत्र्यांनी कोपरी पुलाचं उद्घाटन करुन ठाणेकरांना मोठं गिफ्ट दिलं. यामुळं ठाणे, घोडबंदर, भिवंडी, नाशिक, कल्याण, डोंबिवलीतून येजा करणाऱ्यांची ट्रॅफिकमधून सुटका होणार आहे.

दुसरीकडे आदित्य ठाकरे,संजय राऊतांनी टोले लगावत आणि चिमटे काढत शिंदेंना शुभेच्छा दिल्यात. आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांनी शिंदेंना शुभेच्छा दिल्या. पण ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी मात्र वाढदिवसाच्या दिवशीही शिंदेंवर टीकेची संधी साधलीच.

इकडे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला..राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेंद्र विनायक नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्य्रात 50 खोके लिहिलेला केक कापला..आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं.

हे सुद्धा वाचा

ठाकरे गटानं टीका केली. पण शिंदे गटानं आपल्या नेत्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. शिंदेंच्या समर्थक काही तरुणांनी तर न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला.

मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदेंचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असणं स्वाभाविक होतं. शिंदेंना मुख्यमंत्री होऊन 7 महिने झालेत. 7 महिन्यांआधी कोणी विचारही केला नाही, अशी घटना शिंदेंनी घडवली.

थेट उद्धव ठाकरेंनाच ललकारुन त्यांनी बंड केलं आणि भाजपच्या पाठींब्यावर मुख्यमंत्रिही झाले. 7 महिन्यात शिंदेंनी अनेक लोकप्रिय निर्णय घेतलेत. शिवसेना आणि धनुष्यबाणाची ठाकरेंसोबतची लढाई सुद्धा सुरु आहे. पण अजून शिंदेंकडे तसं पाहिलं तर 2 वर्षांचा कार्यकाळ आहे. त्याचबरोबच आव्हानंही तितकीच आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.