आमच्यासोबत आलात तर सेट करू नाही, तर शूट करू, सुषमा अंधारेंनी वर्मावरच घाव घातला…
बालाजी किणीकर हे ठाकरे गटातून शिंदे गटात गेल्याने बाळू भाऊ तुझं काय दुखलं होतं असा त्यांनी प्रतिसवालही केली आहे.
मुंबईः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून टीका होत होती. त्यानंतर आज त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करत ठाकरे गटाचे बालाजी किणीकर शिंदे गटात गेल्याने ते त्यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, शिंदे गटाचे राजकारण सध्या आमच्यासोबत आलात तर सेट करू नाही तर शूट करू असा प्रयत्न केला जातो आहे असा घणाघातही शिंदे गटावर करण्यात आला. यावेळी 50 खोक्यांची घोषणा देऊन पुन्हा शिंदे गटात गेलेल्या आमदारांवर निशाणा साधण्यात आला.
शिंदे गट आणि भाजप सध्या सूडाचे राजकारण करत असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली. त्यांच्यासोबत गेला तर तुम्ही सेट होऊ शकता नाहीतर ते शूट करु शकतात अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
यावेळी बालाजी किणीकर हे ठाकरे गटातून शिंदे गटात गेल्याने बाळू भाऊ तुझं काय दुखलं होतं असा त्यांनी प्रतिसवालही केली आहे. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी 50 खोके एकदम ओके अशा जोरदा घोषणाही देण्यात आल्या होत्या.
बालाजी किणीकर हे ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडे गेले असले तरी ते बालाजी किणीकर आपला भाऊ आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. बालाजी किणीकर यांच्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, बाळू भाऊने काय केले तर ते इथे कोणत्याचा पदावर नव्हते.
तरीही आमच्या शिवसैनिकानी, पदाधिकाऱ्यांनी बाळूभाऊंना निवडून आणलं, पण बाळूभाऊने काय केले तर ते गुवाहाटीला गेले असा जोरदार निशाणाही त्यांच्यावर साधण्यात आला.