Mumbai | एका अधिकाऱ्यामुळे राज्याचा दीड हजार कोटीचा निधी अडला, आमदार चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट

प्रधान मंत्री आवास योजने (PM Awas Yojana) अंतर्गत मिळणारा राज्याच्या हक्काचा दीड हजार कोटींचा निधी केंद्र सरकारच्या तिजोरीतच अडकून पडल्याचा गौप्यस्फोट आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले.

Mumbai | एका अधिकाऱ्यामुळे राज्याचा दीड हजार कोटीचा निधी अडला, आमदार चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट
आमदार चंद्रशेखर बावनकुळे
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 2:20 PM

मुंबई : महाराष्ट्रातील हजारो घरकुल धारकांना एका म्हाडाच्या अभियंत्याने केलेल्या दिरंगाईचा फटका बसला आहे. तसेच प्रधान मंत्री आवास योजने (PM Awas Yojana) अंतर्गत मिळणारा राज्याच्या हक्काचा दीड हजार कोटीचा निधी केंद्र सरकारच्या तिजोरीतच अडकून पडल्याचा गौप्यस्फोट आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले. प्रधान मंत्री आवास योजनेच्या लाभापासून दोन वर्षांपासून घरकुलधारक (Gharkul scheme) वंचित आहेत. महत्वाचे म्हणजे म्हाडाच्या मुख्य अभियंत्यांना त्यासाठी केंद्र सरकारला यूटीलायझेशन सर्टिफिकेट द्यावे लागते. जिल्हानिहाय घरकुलाच्या बांधकामाचा तो तपशील असतो. तो देताच केंद्राकडून राज्याच्या तिजोरीत प्रधान मंत्री आवास योजनेतील निधी वर्ग होतो. परंतु मुख्य अभियंत्याने तो तपशील केंद्र सरकारला दिला नसल्याने राज्यातील घरकुलधारक प्रधान मंत्री आवास योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या अभियंत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली.

पशुसंवर्धन मंत्र्यांची स्थिती प्रचंड वाईट

आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी अक्षरशः समस्यांचा पाढाच सभागृहात वाचून दाखवला. महाविकास आघाडीचे सरकार मोठ्या घोषणा करते पण त्यासाठी निधी देत नसल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. पशुसंवर्धन खात्याला अर्थसंकल्पात किती निधी मिळाला हे स्पष्ट नसताना आमदार शशिकांत शिंदे यांनी शेतकऱ्यांना साईवाल गायी देण्याचे वचन दिले. एकीकडे पशुसंवर्धन खात्याचे अर्थकारण मजबूत नसून, साईवाल गायींसाठी किमान 5 हजार कोटींची गरज असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सरपंचांवर पथदिव्यांचा भार

ऊर्जामंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालयाने पथ दिव्यांच्या बिलाचा भार सरपंचाच्या खांद्यावर दिला. बिल भरले नाही तर कारवाईच करू असे पत्र पाठवले, हे चुकीचे आहे. पथदिव्यांचे बिल हा ऊर्जा मंत्रालयाचा विषय असून, सरपंचांवर अन्याय असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. सरपंचांना पाठवलेले कारवाईचे पत्र परत घेण्याची त्यांनी मागणी केली. तसेच कंत्राटदारांना वेळेत निधी न दिल्याने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना थंडबस्त्यात गेली. साधारणतः 3 हजार कोटींचा निधी यासाठी अपेक्षित असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच स्थानिक विकासाचा पाया असलेले राज्यातले वैधानिक मंडळ पुन्हा जिवंत होणे गरजेचे असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. क्रीडा क्षेत्राशी निगडित घोषणा पूर्ण करण्यासाठी, महिला बालविकास मंत्रालय आणि ग्राम विकास मंत्रालयाशी निगडित योजना पूर्ण करण्यासाठी जादा निधी देण्याची मागणी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

इतर बातम्या-

WWC 2022, IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर 110 धावांनी मोठा विजय, सेमीफायनलच्या आशा जीवंत

Viral photo : ‘या’ फोटोत तुम्हाला गाढव दिसतंय का? मग डोक्याला अजून ताण देण्याची गरज; JK Rowlingही confused

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.