‘करुन गेला गाव’, नाटकाला उशिर झाल्याने आमदार गीता जैन संतापल्या

आमदार गीता जैन यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत त्यांनी एका अभियंत्याला कानशिलात लगावल्याचं समोर आलं होतं. पावसाळ्यात अतिक्रमण विरोधात कारवाई केल्याने आमदार संतापल्या होत्या. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

'करुन गेला गाव', नाटकाला उशिर झाल्याने आमदार गीता जैन संतापल्या
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 11:52 PM

मीरा रोड | 7 ऑगस्ट 2023 : आमदार गीता जैने या थिएटरच्या बुकिंग कर्मचाऱ्यावर आज चांगल्याच भडकल्या. तांत्रिक बिघाडामुळे नाटकाला उशिर झाल्यामुळे गीता जैन संतापल्या. “हे धंदे करता का तुम्ही लोकं नाट्यगृह चालवायचे? ज्यांना पाचचा वेळ दिला त्यांना साडेसहापर्यंत थिएटर देत नाही. मला कुणाशीही बोलायचं नाही. तुम्ही मला लिहून द्या की, साडेसहाला हॉल दिलाय. मला कुणाशीच बोलायचं नाहीय”, अशा शब्दांत गीता जैन संतापल्या.

आमदार गीता जैन यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत त्यांनी एका अभियंत्याला कानशिलात लगावल्याचं समोर आलं होतं. पावसाळ्यात अतिक्रमण विरोधात कारवाई केल्याने आमदार संतापल्या होत्या. संबंधित घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आमदार गीता जैन यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आली आहे. या व्हिडीओतही त्या संतापल्या आहेत. या व्हिडीओत त्या एका पालिका कर्मचाऱ्यावर संतापल्या आहेत.

मीरा भाईंदर महापालिकेच्या नाट्यगृहातील व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अपक्ष आमदार गीता जैन या थिएटरच्या बुकिंग कर्मचार्‍यांवर जोर-जोरात ओरडताना दिसत आहेत. तर कर्मचारी आपल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करताना दिसत आहे.

गीता जैन नेमकं का संतापल्या?

या घटनेबाबत आम्ही महापालिकेच्या उपायुक्त कल्पिता पिंपळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी याबाबत माहिती दिली. “६ ऑगस्ट रोजी काशी मिरा येथील भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात सुमिरन मंडळाच्या कार्यक्रमासाठी सायंकाळी साडेपाच वाजताचे बुकिंग होते. त्याच दिवशी मराठी नाटक “करुन गेला गांव” या नाटकची दुपारची बुकींग घेण्यात आली होती. मराठी नाटकाच्या दरम्यान काही तांत्रिक बिघाडामुळे नाटक 6 वाजून 10 मिनिटांनी संपले, याचाच राग आल्याने गीता जैन थिएटरचे बुकिंग घेणारे कर्मचारीवर चांगलेच संतापले होते”, अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्त कल्पिता पिंपळे यांनी दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.