शिवरायांचा आणि एकनाथ शिंदेंचा गनिमी कावा सारखाच, आणखी एका नेत्याने केली तुलना…

एकनाथ शिंदे हे काही बेईमान नाही आहेत आणि शिवाजी महाराजांनीही वेळप्रसंगी गनिमी काव्याचा उपयोग केला होता. तोच गनिमी कावा एकनाथ शिंदे यांनीही वापरला आहे

शिवरायांचा आणि एकनाथ शिंदेंचा गनिमी कावा सारखाच, आणखी एका नेत्याने केली तुलना...
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 7:10 PM

मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, मंगल प्रभात लोढा आणि आता आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि एकनाथ शिंदे यांची तुलना केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून सत्तांतर केल्यानर मविआ सरकारला पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे हे एकनाथ शिंदे यांचे हे बंड आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला गनिमी कावा हा एकच होता अशी तुलना करत आमदार संजय गायकवाड यांनी नवा वाद निर्माण केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भगतसिंह कोश्यारी, सुधांशू त्रिवेदी, मंगल प्रभात लोढा यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटातीलच आमदार संजय गायकवाड यांनी थेट एकनाथ शिंदे आणि शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी बोलताना म्हटले आहे की, एकनाथ शिंदे हे काही बेईमान नाही आहेत आणि शिवाजी महाराजांनीही वेळप्रसंगी गनिमी काव्याचा उपयोग केला होता.

तोच गनिमी कावा एकनाथ शिंदे यांनीही वापरला आहे असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तर आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांची तुलना शिवाजी महाराज यांच्याबरोबर केल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांची बाजू घेत.

ती चांगल्या हेतूने तुलना केल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त आणि अपमानजनक बोलले जात असल्याने विरोधकांनी राज्यसरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.