खैरै असोत की राऊत, मीडियामध्ये येण्यासाठी काहीही करतात, शिंदे गटाने ठाकरे गटाला निकालातच काढलं

शिंदे गटाने ज्यावेळेपासून बंडखोरी केली आहे, त्यादिवसांपासून त्यांच्यावर खोके सरकार अशी जोरदार टीका केली जाते. शिंदे गटावर पैसे घेतले असल्याचाही आरोप केला जात आहे.

खैरै असोत की राऊत, मीडियामध्ये येण्यासाठी काहीही करतात, शिंदे गटाने ठाकरे गटाला निकालातच काढलं
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 8:16 PM

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी जोरदारपणे झडत आहेत. त्यामुळे या दोन्ही गटातील वाद विकोपाला गेले आहेत. त्यातच संजय राऊत यांना जामीन मंजूर झाल्यापासून संजय राऊत यांच्यावर आणि संजय राऊत शिंदे गटावर निशाणा साधत आहेत. त्यातच चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर टीका केल्यापासून त्यांच्यावरही जोरदार टीका केली जात आहे.

त्यामुळे आता आमदार संजय शिरसाठ यांनीही माजी खासदार चंद्रकांत खैर आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत आणि चंद्रकांत खैरे यांना आता कोणतीच कामं नसल्यामुळे त्यांच्याकडून चर्चेत राहण्यासाठी काहीही वक्तव्य केली जात असल्याचा टीका संजय शिरसाठ यांनी केली आहेत.

ठाकरे गटावर टीका करताना आमदार संजय शिरसाठ यांनी खासदार संजय राऊत आणि चंद्रकांत खैरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

सत्ता गेल्याने यांच्याकडे सध्या कोणती कामं नसल्याचे म्हणत संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे की, चंद्रकांत खैरे असोत की राऊत यांना बडबड करण्याव्यतिरिक्त काहीही कामं उरलेलं नाही असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

सध्याच्या राजकारणात चर्चेत राहण्यासाठी आणि मीडियामध्ये येण्यासाठी ते काहीही करत असतात, त्यामुळे तेसकाळी उठून बोलत राहतात असा टोलाही त्यांना लगावला आहे.

त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गटाचा वाद उफाळून येण्याची चिन्हं दिसत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून शिंदे-फडणवीस गटाची सत्ता स्थापन केल्यानंतरही अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटामध्ये येत आहेत.

त्यावर बोलताना संजय शिरसाठ म्हणाले की, आता ठाकरे गटाचा पक्ष संपत चालला आहे तसेच उद्धव ठाकरे यांचा पक्षावर कोणताही कंट्रोल राहिलेला नाही अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

शिंदे गटाने ज्यावेळेपासून बंडखोरी केली आहे, त्यादिवसांपासून त्यांच्यावर खोके सरकार अशी जोरदार टीका केली जाते. शिंदे गटावर पैसे घेतले असल्याचाही आरोप केला जात आहे.

त्यामुळे त्यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला जातो. त्यावर बोलताना संजय शिरसाठ म्हणाले की, पैसे घेतले दिले यांना काय त्याचं, आम्ही आमचा पक्ष वाढवतो आहे अशा शब्दात त्यांनी पलटवार केला आहे. त्यामुळे आमच्या टीका करण्यापेक्षा यांनी त्यांचा पक्ष संपतोय त्याकडे लक्ष द्यावे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.