लाखांचे आमदार बक्षिस देणार; पण पैसा नेमका कुठून येणार? वाचा सविस्तर रिपोर्ट

गावकी-भावकी, वाद-बखेडा यापासून सुटका करण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील सर्व पक्षीय आमदार मैदानात उतरले आहेत. (MLA's offered to development fund for villages to make unopposed Gram Panchayat Election)

लाखांचे आमदार बक्षिस देणार; पण पैसा नेमका कुठून येणार? वाचा सविस्तर रिपोर्ट
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:55 PM

मुंबई: गावकी-भावकी, वाद-बखेडा यापासून सुटका करण्यासाठी आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील सर्व पक्षीय आमदार मैदानात उतरले आहेत. या आमदारांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणाऱ्या गावांना 11 ते 25 लाख रुपयांचा विकास निधी बक्षिस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. आमदारांच्या या आव्हानाला काही ग्रामपंचायतींनी प्रतिसादही दिला आहे. त्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा… (MLA’s offered to development fund for villages to make unopposed Gram Panchayat Election)

निलेश लंके यांची सर्वात पहिली घोषणा

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वात आधी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध जाहीर करण्यासाठी 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा केली होती. गावांमधील निवडणुका बिनविरोध पार पाडा आणि 25 लाखांचा विकास निधी मिळवा, अशी घोषणा निलेश लंके यांनी केली होती. बिनविरोध निवडणुका करून शासनाचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवली होती.

चिमणराव पाटील 21 लाख देणार

पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यास 25 लाखांची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्यास 21 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

तरुण कारखानदाराकडून प्रत्येकी 1 लाख

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी केवळ आमदारच नवे तर उद्योजकही पुढे सरसावले आहेत. पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील अभिजीत पाटील हे तरुण उद्योजक आहेत. त्यांचा उस्मानाबाद येथे धाराशीव साखर कारखाना, नाशिक येथे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना आणि नांदेड येथे डीव्हीपी व्यंकटेश्वरा साखर कारखाना आहे. त्यांनी या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात म्हणून गावांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.

तीन कोटींच्या निधीतून देणार विकास निधी

आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास घडवून आणण्यासाठी 3 कोटींचा निधी दिला जातो. त्यातील निधी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणाऱ्या गावांच्या विकासासाठी वापरण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणाऱ्या गावांतील समस्यांची यादी बनवून त्यानुसार या बक्षिस म्हणून जाहीर केलेल्या निधीतून विकासकामे करण्यात येणार असल्याचं एका आमदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.

कोरोनामुळे विकास निधी रखडला

दरम्यान, कोरोना संकटामुळे गेल्या आठ महिन्यांपासून आमदारांना विकास निधी मिळालेला नाही. त्यामुळे या आमदारांच्या विभागात कामे होऊ शकली नाहीत. लवकरच हा निधी देण्यात येणार असल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र, निधी कधी मिळेल हे नक्की माहीत नसल्याने ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणाऱ्या गावांना तात्काळ हा निधी मिळण्याची शक्यता धुसर असल्याचंही हा आमदार म्हणाला. (MLA’s offered to development fund for villages to make unopposed Gram Panchayat Election)

निवडणुका बिनविरोध करा, बक्षिस जाहिर करणारे आमदार:

>> निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस (पारनेर,अहमदनगर) आमदार निधीतून 25 लाखांचा विकास निधी देणार

>> कैलाश पाटील, शिवसेना (कळंब-उस्मानाबाद) आमदार निधीतून 25 लाख रुपये देणार

>> रत्नाकर गुट्टे, रासप ( गंगाखेड,परभणी) स्वत:च्या आमदार निधीतून गावांच्या लोकसंख्येनुसार 11 ते 21 लाखांचा निधी देणार

>> अभिमन्यू पवार, भाजप (औसा, लातूर) आमदार निधी आणि इतर निधीतून 21 लाखांचा निधी देणार

>> चिमणराव पाटील, शिवसेना (पारोळा, जळगाव) आमदार निधीतून 21 लाख रुपये

>> श्वेता महाले, भाजप (चिखली, बुलढाणा) आमदार निधीतून 21 लाख रुपये

>> सुनील शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस (मावळ) आमदार निधीतून 11 लाख

>> अभिजित पाटील पंढरपूरचे कारखानदार स्वत:कडून प्रत्येकी 1 लाख रुपये देणार (MLA’s offered to development fund for villages to make unopposed Gram Panchayat Election)

संबंधित बातम्या:

गावची निवडणूक बिनविरोध करा, 25 लाखांचा निधी मिळवा; आमदार निलेश लंकेंची ऑफर

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

मुदतबाह्य 1566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या हालचाली, तर 12,668 ग्रामपंचायत निवडणुकांना स्थगिती

(MLA’s offered to development fund for villages to make unopposed Gram Panchayat Election)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.