MLC Election 2022: शरद पवार विरोधी आमदारांना शब्द टाकणार?; फडणवीसांचा ‘चमत्कार’ उलटवणार?

MLC Election 2022: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. या निवडणुकीत भाजपने सत्ताधारी गटातील अपक्ष आमदारांना आपल्या गळाला लावण्यात यश मिळवलं होतं. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

MLC Election 2022: शरद पवार विरोधी आमदारांना शब्द टाकणार?; फडणवीसांचा 'चमत्कार' उलटवणार?
शरद पवार विरोधी आमदारांना शब्द टाकणार?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 5:07 PM

मुंबई: विधान परिषद निवडणुकीसाठी (Maharashtra MLC Election) उद्या मतदान होणार आहे. भाजपने अतिरिक्त उमेदवार मैदानात उतरवल्याने ही निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा झालेला पराभव आणि भाजपचा झालेला विजय यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवीस कामाला लागले आहेत. तर, विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार मैदानात उतरले आहेत. या शिवाय राष्ट्रवादीच्या (ncp) उमेदवारांनीही अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन मतांची बेगमी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून आणि भाजपला (bjp) चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे विरोधी पक्षातील आमदारांना शब्द टाकणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. या निवडणुकीत भाजपने सत्ताधारी गटातील अपक्ष आमदारांना आपल्या गळाला लावण्यात यश मिळवलं होतं. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. फडणवीसांना काही लोकांना आपलसं करण्यात यश आलं आहे. त्यांचा हा चमत्कार मान्य करावा लागेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली होती. तसेच तिकडेही माझ्या शब्दाला किंमत देणारे काही लोक आहेत. शब्द टाकला असता तर त्यांनी मला नाही म्हटलं नसतं, अशी प्रतिक्रियाही पवार यांनी व्यक्त केली होती.

हे सुद्धा वाचा

पवार शब्द टाकणार?

राष्ट्रवादीकडून रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे हे विधान परिषदेची निवडणूक लढत आहेत. तीन अपक्ष आणि समाजवादी पार्टीची दोन मते राष्ट्रवादीला मिळणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार सहज निवडून येणार आहेत. मात्र, तर काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराला 9 मतांची आवश्यकता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अतिरिक्त मतांवर काँग्रेसचा दुसरा उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून अधिकच्या मतांसाठी शरद पवार हे विरोधी पक्षातील आमदारांना शब्द टाकणार का? असा सवाल आता केला जात आहे. भाजपने या निवडणुकीत एकनाथ खडसे यांना टार्गेट केलं आहे. त्यामुळे खडसेंना दगाफटका होऊ नये म्हणून चाणक्यनीती काय असते हे पवार दाखवून देणार का? असाही प्रश्न केला जात आहे.

निवडणूक मुंबईत, पवार दिल्लीत

उद्या विधान परिषदेची निवडणूक आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज दिल्लीला रवाना झाले आहेत. उद्याही ते दिल्लीत राहणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीसाठी ते दिल्लीत गेले आहेत. दिल्लीला जाण्यापूर्वी निवडणुकीचा सर्व आढावा पवारांनी घेतल्याचंही सांगितलं जात आहे.

भाजपची दोन मते राष्ट्रवादीला मिळणार

भाजपच्या दोन आमदारांची मते राष्ट्रवादीला या निवडणुकीत मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपमध्ये एकनाथ खडसे यांचा समर्थक आमदार आहे. त्यांचं मत खडसेंनाच मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या एका आमदाराने राष्ट्रवादीला मतदान केलं होतं. शरद पवार यांना सांगून या आमदाराने मतदान केलं होतं. पवारांनी त्याचा गौप्यस्फोटही केला होता. त्या आमदाराचं मत यावेळीही राष्ट्रवादीला मिळणार असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे भाजपची दोन मते कमी होणार आहेत. परिणामी पाचवा तर सोडा भाजपच्या चौथ्या उमेदवाराचा विजयही धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.