उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता, शिक्षण दहावी, निवडणूक शपथपत्रातून आली माहिती समोर

Milind Narvekar:

उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता, शिक्षण दहावी, निवडणूक शपथपत्रातून आली माहिती समोर
Milind Narvekar
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 7:46 AM

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्या ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांना संधी दिली आहे. त्यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रात संपत्ती, शिक्षण आणि गुन्ह्याची माहिती दिली आहे. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. शिक्षण दहावीपर्यंतच झाले आहे. त्यांच्याकडे आणि त्यांच्या पत्नीकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे.

काय दिले शपथपत्रात

उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर विधान परिषद निवडणुकीत उमेदवार आहे. त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. त्यांच्याकडे रोख रक्कम 45 हजार रुपये, तर पत्नीकडे 36 हजार रुपये रोख रक्कम आहे. तसेच त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 74 लाख 13 हजार 243 रक्कम तर पत्नीकडे 8 कोटी 22 लाख 118 रक्कम आहे.

नार्वेकर यांची म्युचलफंडमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक

मिलिंद नार्वेकर यांची बॉण्ड्स किंवा म्युचल फंडमध्ये गुंतवणूक आहे. त्यांचे 50 हजार तर पत्नीने 12 कोटी 40 लाख 82 हजार 526 रुपये गुंतवले आहेत. पोस्ट ऑफिस अथवा इतर पॉलिसीमध्ये मिलिंद नार्वेकर यांचे 3 लाख 68 हजार 729 रुपये तर पत्नीचे 67 लाख 88 हजार 558 रुपये आहेत.

हे सुद्धा वाचा

नार्वेकर दाम्पत्यांकडे लाखोंचे दागिने

नार्वेकर दाम्पत्याकडे लाखोंचे सोने, चांदी आणि हिऱ्यांचे दागिने आहेत. सोने – 355.94 ग्रॅम असून त्याची किंमत 24 लाख 67 हजार 981 रुपये आहे. चांदी 12.56 किलोग्रॅम असून त्याची किंमत 9 लाख 74 हजार 656 रुपये आहेत. हिरे 80.93 असून त्याची किंमत 36 लाख 85 हजार 552 रुपये आहे. एकूण दागिन्यांची किंमत 71 लाख 28 हजार आहे. त्यांच्या पत्नीकडे 425 ग्रॅम सोने किंमत 29 लाख 26 हजार 21 रुपये, चांदी – 6.26 किलो किंमत 4 लाख 85 हजार 776 रुपये तर हिरे 90.96 किंमत 33 लाख 49 हजार 623 रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे असलेल्या एकूण दागिन्यांची किंमत 67 लाख 61 हजार 420 रुपये आहे.

शेअरमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक

मिलिंद नार्वेकर यांची श्री बालाजी कॉम. एलएलपी कंपनी आहे. त्यात 50 टक्के शेयर्स त्यांचे तर पत्नीचे 50 टक्के शेयर्स आहेत. त्यामध्ये त्यांची स्वतःची एकूण रक्कम 10 कोटी 11 लाख 28 हजार 152 तर, पत्नीची एकूण रक्कम 31 कोटी 25 लाख 33 हजार 560 रुपये आहे. मिलिंद नार्वेकर यांचे अदानी पोर्ट्स आणि स्पेशल, अंबुजा सिमेंट, अशोक लेयलँड, एसीयन पेंट्स, IDBI बँक, ICCI बँक आणि इतर कंपन्यामध्ये शेयर्स खरेदी केले आहे.

कोकण अन् बीड जिल्ह्यात जमीन

मलिंद नार्वेकर कुटुंबाची कोकण आणि बीडमध्ये जमीन आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड (तालुका दापोली) येथे 74.80 एकर जमीन आहे. या जमिनीमध्ये पत्नीचा 50 टक्के वाटा आहे. बीड जिल्ह्यातील बाणेवाडी गावात 0.19 एकर जमीन आहे. तसेच बंगळूर येथे पत्नीच्या नावावर 2325 स्क्वेअर फूट जमीन आहे.

मालाड आणि बोरिवलीत घर

मलिंद नार्वेकर कुटुंबाचे मुंबईतील मालाड आणि बोरिवली येथे 1000 स्क्वेअर फुटाचे घर आहे. तसेच त्यांच्या पत्नीच्या नावावर अलिबाग येथे एक फार्म हाऊस आहे. पाली हिल इथं राहत असलेल घर पण स्वतःच्या नावावर नाही बायकोच्याही नाही. स्वतःच्या मालमत्तेची एकूण रक्कम 4 कोटी 17 लाख 63, हजार 323, पत्नीच्या मालमत्तेची रक्कम 11 कोटी 74 लाख 6 हजार 490 रुपये आहे.

कर्ज २६ लाख, स्वत:चे वाहन नाही

मिलिंद नार्वेकर आणि पत्नीचे उत्पनाचे साधन वैयक्तीक पगार, घरांचे भाडे, व्यावसायिक उत्पन्न आहे. त्यांच्यावर 26 लाख 38 हजार 160 रुपये कर्ज, तर पत्नीवर 3 कोटी 22 लाख 45 हजार रुपये कर्ज आहे. 1 कोटी 54 लाख 81 हजार 989 बँकेचे कर्ज आहे. त्यांच्या पत्नीने 38 लाख 94 हजार 807 रुपये बँकेचे कर्ज घेतले आहे. तसेच मिलिंद नार्वेकर यांच्या स्वतःच्या नावावर कोणतेही वाहन नाही.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.