CORONA | अमित ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या भेटीला, बैठकीत ‘या’ चार मुद्द्यांवर चर्चा

मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. (Amit Thackeray Rajesh Tope Meeting) 

CORONA | अमित ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या भेटीला, बैठकीत 'या' चार मुद्द्यांवर चर्चा
Follow us
| Updated on: May 22, 2020 | 8:25 PM

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर (Amit Thackeray Rajesh Tope Meeting) मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. ‘जेतवन’ या  शासकीय निवासस्थानी झालेल्या या बैठकीत कोरोनाबद्दल चार प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. दरम्यान यापूर्वीही अमित ठाकरे यांनी डॉक्टरांच्या मानधनात कपात होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं होतं.

अमित ठाकरे-राजेश टोपे यांच्या बैठकीतील मुद्दे

  1. राज्यात कोरोना आणि अन्य उपचारासांठी जी रुग्णालय कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता स्पष्टपणे नागरिकांना कळावी यासाठी एक अॅप विकसित करावं.
  2. बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी आणि बंधपत्रित अधिपरिचारिका यांच्या पगारातील कपात रद्द करुन त्यांचा पगार पूर्ववत करावा.
  3. प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन द्यायलाच हवी.
  4. प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही बेड्स आरक्षित ठेवावेत. तसेच त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानेच करावा.

या बैठकीत या चार मुद्द्यांवर अमित ठाकरे आणि राजेश टोपे यांनी सविस्तर चर्चा केली. अमित ठाकरे यांनी मांडलेल्या या सर्व विषयांवर राजेश टोपे यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच हे सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावू असे आश्वासनही राजेश टोपे यांनी अमित ठाकरेंना दिलं.

अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दरम्यान यापूर्वी कोरोनाविरोधाच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या पगारात कपात केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते.

“महाराष्ट्र सरकारच्या 20 एप्रिल 2020 रोजी काढलेल्या आदेशानुसार बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मासिक मानधन 55 हजार ते 60 हजार रुपये इतकं आहे. याशिवाय अधिकाऱ्यांना ‘सेवार्थ प्रणाली’ अंतर्गत मिळणारे मासिक वेतन आणि भत्ते मिळून 78 हजार रुपये इतकं मानधन मिळते. मात्र, नव्या आदेशानुसार या अधिकाऱ्यांचे मानधन ‘कंत्राटी सेवा’ अंतर्गत निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांच्या मानधनात 20 हजार रुपये इतकी कपात करण्यात आली आहे. या तरुण डॉक्टरांच्या मानधनातील कपात अन्यायकारक आहे”, असं अमित ठाकरे या पत्रात म्हणाले (Amit Thackeray Rajesh Tope Meeting)  होते.

संबंधित बातम्या : 

‘डॉक्टर हेच देव’, त्यांच्या मानधनात कपात होणार नाही याची काळजी घ्यावी, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षांची बैठक, उद्धव ठाकरे, शरद पवार, संजय राऊत यांच्यासह 22 पक्षाचे नेते बैठकीला हजर

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.