मनसे, भाजप आणि शिंदे गटाच्या युतीची चर्चा, ठाकरे गटाला घेरण्यासाठी तीन पक्षांचा नेमका प्लॅन काय?

महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात फार महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळात नवे राजकीय समीकरणं प्रत्यक्ष निवडणुकीत उदयास येताना दिसतील.

मनसे, भाजप आणि शिंदे गटाच्या युतीची चर्चा, ठाकरे गटाला घेरण्यासाठी तीन पक्षांचा नेमका प्लॅन काय?
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 6:36 PM

सुमेध साळवे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात फार महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळात नवे राजकीय समीकरणं प्रत्यक्ष निवडणुकीत उदयास येताना दिसतील. पण हे नवे समीकरण शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी धक्का देणारे असू शकतात. कारण तीन मोठे पक्ष ठाकरे गटाविरोधात आगामी निवडणुकांमध्ये प्रत्यक्षपणे आव्हान देताना दिसतील. हे तीन पक्ष म्हणजे भाजप, शिंदे गट आणि मनसे. कारण या तीनही पक्षांमध्ये सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. तीनही पक्षांचे तरुण नेते पडद्यामागून सूत्र हलवत आहेत. त्यामुळे आगामी काळात युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे या तीन पक्षाच्या आव्हानांना कसं उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या युवा सेनेच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलीय. या बैठकीत खासदार श्रीकांत शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत.

सिनेट निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच या बैठकीत महापालिका निवडणुका, अयोध्या दौऱ्यासंदर्भातस चर्चा होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या युवा सेनेची कार्यकारिणी मजबूत करण्यासाठी श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

हे सुद्धा वाचा

या सगळ्या घडामोडी पाहता सिनेट निवडणुकीवरून राजकारण तापण्याची दाट शक्यता आहे. कारण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना घेरण्यासाठी शिंदे गट, मनसे आणि भाजप एकत्र मैदानात उतरणार आहेत. त्यासाठी शिंदे गटातील पूर्वेस सरनाईक आणि मनसे नेते नितीन सरदेसाई यांचे पुत्र यश सर्देसाई यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सिनेट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून निरंजन डावखरे यांना जबाबदारी देण्यात आलीय.

दरम्यान, सध्या आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेची सिनेटवर वर्चस्व आहे. सिनेटचे दहाही सदस्य आदित्य ठाकरे यांच्या युवासेनेचे असल्याची चर्चा होती. पण यातील दोन सदस्य सध्या शिंदे गटात आहेत. लवकरच सिनेटच्या निवडणुका जाहीर होतील. यासाठी सर्व पक्षांनी मतदार नोंदणीसाठी कंबर कसलीय.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.