Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनाई आदेश झुगारून मनसेने दहीहंडी फोडली; नांदगावकरांसह मुंबई, ठाण्यातील मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिकरित्या सण, उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही मनसेने मनाई आदेश झुगारून दहीहंडी साजरी केली. (mns celebrate dahi handi, bala nandgaonkar detained by police)

मनाई आदेश झुगारून मनसेने दहीहंडी फोडली; नांदगावकरांसह मुंबई, ठाण्यातील मनसैनिकांची पोलिसांकडून धरपकड
bala nandgaonkar
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 11:37 AM

मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सार्वजनिकरित्या सण, उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आलेली असतानाही मनसेने मनाई आदेश झुगारून दहीहंडी साजरी केली. मुंबईसह ठाण्यात मनसैनिकांनी दहीहंडी जल्लोषात साजरी केली. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह मुंबई आणि ठाण्यात दहीहंडी साजरी करणाऱ्या काही मनसेसैनिकांची धरपकड करण्यात आली आहे. त्यांच्यावर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं. (mns celebrate dahi handi, bala nandgaonkar detained by police)

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दहीहंडी फोडणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार आज पहाटेच दादरमध्ये मनसेने दहीहंडी फोडून जल्लोष केला. मानखुर्दमध्येही मनसेने दहीहंडी उत्सव साजरा केला. मनसेचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन विभाग अध्यक्ष रवी गवस यांनी केले होते. मुलुंड, वरळीनाका आणि मलबार हिल येथेही मनसेने दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला.

नांदगावकरांनी फोडली दहीहंडी

दरम्यान, मनसे नेते बाळा नांदगावकर हे काळाचौकी मैदानात आले आहेत. या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार असून मैदानात मनसे सैनिक मोठ्या प्रमाणावर जमले आहेत. तर, पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केला होता. तसेच आम्हाला उत्सव साजरा करू द्या नाही तर आम्ही ठिय्या आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

पोलिसांकडून धरपकड

ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दहीहंडी फोडून उत्सव साजरा केला. मनसे विद्यार्थी सेनेने लक्ष्मी पार्क, वर्तकनगर येथे दहीहंडी उभारत चार थराची हंडी फोडली. गोविंदांनी कोरोनाचे निर्बंध झुगारत ही हंडी फोडून मनसेचा झेंडा फडकवला. तर मनसेने नौपाडा येथील कार्यालयासमोर एक थराची हंडी फोडली. मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी ही दहीहंडी फोडली. कृष्ण जन्माष्टमी च्या दिवशी पूजाअर्चा करत मनसेच्या कार्यालयासमोर उभारण्यात आलेली दहीहंडी फोडण्यात आली.

यावेळी पोलिसांनी मज्जाव केला होता. मात्र रितीरिवाजाप्रमाणे कमी उंचीची दहीहंडी बांधून ती फोडण्यात आली. जमावबंदीचे आदेश झुगारून मनसेसैनिकांनी घोषणा देतच दहीहंडी फोडली. त्यामुळे पोलिसांनी मनसे सैनिकांची धरपकड केली. मनसे नेते अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे पोलिसांना दहीहंडी शांततेत साजरी करू द्यावी म्हणून विनवणी करत होते. मात्र, पोलिसांनी घोषणा देणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे या परिसरात मोठा जमाव जमला होता. या कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आम्हाला सण साजरा करण्यास बंदी का?

मनसे हे जे ठरवते ते करते. आम्हाला अनेक ठिकाणवरून फोन आले. उत्तर प्रदेशवरून देखील फोन आले. बाळासाहेबानंतर हिंदूंबाबत कोणी भूमिका घेतली असेल तर ती राज ठाकरे यांनीच. आम्हाला सण साजरा करण्यासाठी बंदी का? बाकी इतर कार्यक्रम होतात, पण सण का होऊ देत नाही? असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे. आम्ही आमचे काम करणार. पोलिसांनी त्यांचे काम करावे. आता देखील काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असं त्यांनी सांगितलं.

भगवती मैदानात दाखल

दरम्यान, मनसेकडून ठाण्यातील भगवती मैदानात सार्वजनिक दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी मनसे सैनिक भगवती मैदानात जमले आहेत. मात्र, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मनसे सैनिकांना पांगवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या ठिकाणी दहीहंडी साजरी होणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (mns celebrate dahi handi, bala nandgaonkar detained by police)

संबंधित बातम्या:

Mumbai rains: मुंबईसह ठाण्यात पावसाची जोरदार हजेरी, पुढील तीन दिवस पावसाचेच; ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी

Mumbai rains Maharashtra rain Live : मुंबईत पावसाचा जोर वाढला, औरंगाबादेत धरण फुटल्याने 30 ते 40 गाई म्हशींचा मृत्यू

Aurangabad Rain : तुफान पावसाने तलाव फुटला, मंदिरात अडकलेल्या पुजाऱ्याला स्लॅब फोडून बाहेर काढलं

(mns celebrate dahi handi, bala nandgaonkar detained by police)

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.