Raj Thackeray | राज ठाकरे यांच्याकडून मराठीत व्हिडीओ रिल्स बनवणाऱ्यांना नवी जबाबदारी, विनायक माळी, अथर्व सुदामे यांना मंचावर बोलावून म्हणाले…

"तुमच्यामध्ये संपूर्ण समाज गुंतवून टाकण्याची ताकद आहे. जो समाज आपली सुख-दु:ख सर्व गोष्टी विसरतो आणि तुमच्यामध्ये रममान होतो ही ताकद केवढी मोठी असेल", असं राज ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray | राज ठाकरे यांच्याकडून मराठीत व्हिडीओ रिल्स बनवणाऱ्यांना नवी जबाबदारी, विनायक माळी, अथर्व सुदामे यांना मंचावर बोलावून म्हणाले...
Follow us
| Updated on: Aug 01, 2023 | 9:26 PM

मुंबई | 1 ऑगस्ट 2023 : मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण रिलबाज पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात सोशल मीडियावर रिल्सच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम करणाऱ्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठी रिल्सस्टारवर महत्त्वाची आणि मोलाची जबाबदारी दिली. यावेळी त्यांनी सोशल मीडिया स्टार विनायक माळी आणि अथर्व सुदामे यांना मंचावर बोलावून त्यांचं कौतुक केलं. तसेच त्यांनी सर्व रिल्सस्टार्सला मोलाची जबाबदारी दिली.

“तुम्ही जे करत आहात ते किती महत्त्वाचं आणि मोलाचं आहे याची जाणीव तुम्हाला असणं हे खूप आवश्यक आणि गरजेचं आहे. पाकिस्तानी कलावंत आपल्या देशात येतात, काम करायला बघतात, पैसे कमवायला बघतात, त्यांच्याकडचे अनेक कलाकार, गायक इथे येतात. त्यांच्याकडे काही नाहीय. पण आपल्या देशात गेल्या अनेक वर्षात जे गायक, लेखक, कवी, गीतकार, कलाकार झाले, सिनेमा, नाट्यक्षेत्र, गायन, संगीत, या विविध अंगांमध्ये आज तुम्हीदेखील येतात, ती म्हणजे रिल्स”, असं राज ठाकरे म्हणाले.

“तुमच्यामध्ये संपूर्ण समाज गुंतवून टाकण्याची ताकद आहे. जो समाज आपली सुख-दु:ख सर्व गोष्टी विसरतो आणि तुमच्यामध्ये रममान होतो ही ताकद केवढी मोठी असेल. मला असं वाटतं हे गायक, लेखक, संगीतकार, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते, कलावंत या सर्वच क्षेत्रामधील लोकं आणि आज तुम्ही, तुमचे या देशावरती खूप मोठे ऋण आहेत. याचे कारण तुम्ही लोकं नसता तर या देशात कधीच आराजक आलं असतं”, असं राज ठाकरे म्हणाले.

“आजूबाजूला घडणाऱ्या ज्या वाईट गोष्टी आहेत, त्या वाईट गोष्टींकडे आजपर्यंत हा देश दुर्लक्ष करत आला. टेलिविजन सिरिअल्स पाहत आला, चित्रपट पाहत आला, आज रिल्स पाहतोय. या सगळ्या गोष्टी पाहत असताना तो आपली सर्व दु:ख, आजूबाजूच्या घटना, आजची सध्याची महाराष्ट्रातील परिस्थिती, कोण कुठे आहे याचा काही पत्ताच लागत नाहीय”, असं राज ठाकरे म्हणाले.

“कोण कुणाच्या पक्षात गेलाय, कोण कुठे गेलाय, कोण आज रात्री शिव्या घालतोय, सकाळी दुसऱ्या पक्षात गेलाय, निवडणुकीच्या काळात एका पक्षाकडे तिकीट मागितलं, नाही मिळालं, दुसऱ्याकडे गेला. हे ज्या सगळ्या गोष्टी सुरु आहेत त्याकडे दुर्लक्ष फक्त तुमच्यामुळे होतंय”, असं राज ठाकरे म्हणाले. “जो आज समाज शांत बसलाय, शांत आहे किंवा आनंदी आहे याचं सगळ्यात मोठं श्रेय तुमचं आहे. संगीतकार, गायक, चित्रपट निर्माते, कलाकारांचं श्रेय आहे”, असंही ते म्हणाले.

‘अरे तू पण आला आहेस का? हा माझा अत्यंत आवडता’

राज ठाकरे आपलं भाषण सुरु असताना “अरे तू पण आला आहेस का? हा माझा अत्यंत आवडता. तू उभा राहा”, असं राज ठाकरे रिल्सस्टार अथर्व सुदामे याला उद्देशून म्हणतात. “तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहत असतो बरंका, अनेकांच्या पाहतो”, असं राज ठाकरे म्हणाले. “ये वर ये”, असं म्हणत राज ठाकरे सोशल मीडिया स्टार विनायक माळी आणि अथर्व सुदामे यांना मंचावर बोलवतात.

“अनेक लोकं असतील इथे. माफ करा, भेदभाव नाही. मला समोर बसलेला दिसला म्हणून बोलावलं”, असं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. “मला फक्त सांगायचं आहे की, तुमच्यावर आज खूप मोठी जबाबदारी आहे. या महाराष्ट्रात होत असलेल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यावर तुमच्या रिल्सच्यामार्फत प्रबोधन झालं पाहिजे”, असं राज ठाकरे म्हणाले.

“आता सध्या राजकारण ज्या खालच्या थरावर गेलं आहे त्या खालच्या थरावर जायची तुम्हाला गरज नाहीय. पण मला असं वाटतं की, मी एक स्वत: व्यंगचित्रकार असल्याने कोणत्या गोष्टीला चिमटी काढायची, एखादी गोष्ट समजवायची कशी हे मला माहिती आहे. तुम्ही तुमच्या विनोदी पद्धतीने महाराष्ट्राचे प्रश्न मांडावे जेणेकरुन अनेकांना त्याची जाणीव होईल”, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.