‘युपी-बिहार पेक्षाही महाराष्ट्राचं राजकारण खालच्या पातळीवर गेलंय’, शिवाजी पार्कातील सभेआधी राज ठाकरे बरसले

महाराष्ट्राची आजची राजकीय परिस्थिती खूप घाण आणि गलिच्छ आहे. महाराष्ट्रातलं आताचं राजकारण पाहिलं तर मला असं वाटतं की मी राजकारणासाठी मिसफीट आहे, असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी आज केलंय.

'युपी-बिहार पेक्षाही महाराष्ट्राचं राजकारण खालच्या पातळीवर गेलंय', शिवाजी पार्कातील सभेआधी राज ठाकरे बरसले
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 9:34 PM

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज एका मुलाखतीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रोखठोक भूमिका मांडली आहे. राज्यातील राजकारण जे घडतंय ते आवरलं पाहिजे. नाहीतर उत्तर प्रदेश (UP) किंवा बिहार (Bihar) सारखी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी राज्यातील तरुण वर्गाला राज कारणात येण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी याबाबतचं वक्तव्य केलं.

“एक मोठा वर्ग राजकारणाच्या बाहेर गेलाय. हा वर्ग इथल्या परिस्थितीला कंटाळून दुसऱ्या देशांमध्ये चांगल्या नोकरी पाहून स्थायिक झालाय. त्यांच्या मनात काय आहे ते मला माहिती नाही. पण माझ्या मनात आहे की, त्यांनी परत यावं. या गोष्टी हातात घेतल्या पाहिजेत. सांभाळल्या पाहिजेत. नाहीतर हे प्रकरण हाताबाहेर जाणार. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती ही उत्तर प्रदेश, बिहार सारखी होईल. मला त्याचीच खूप जास्त भीती वाटते”, असं राज ठाकरे म्हणाले.

‘महाराष्ट्रातलं आताचं राजकारण पाहिलं तर…’

“महाराष्ट्रातलं आताचं राजकारण पाहिलं तर मला असं वाटतं की मी राजकारणासाठी मिसफीट आहे. मला सध्याच्या परिस्थितीला पाहून व्यंगचित्रकार म्हणून काहीच बोलावसं वाटत नाही. महाराष्ट्राची आजची राजकीय परिस्थिती खूप घाण आणि गलिच्छ आहे”, असं रोखठोक मत राज ठाकरे यांनी यावेळी मांडलं. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी यावेळी भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आज सूचक विधान केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे उद्याच्या भाषणात मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्यांवर पुन्हा भूमिका मांडणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

“जे हिंदुत्व-हिंदुत्व बोलतात. त्यांनी मला एकदा त्यांचे हिंदुत्व सांगावे. सौदीमध्ये भोंगे बंद होऊ शकतात तर आपल्याकडे मोदी भोंगे बंद करू का शकत नाहीत? उद्या सभा आहेत. त्यात मी बोलेनच त्यामध्ये अजून कदाचित काहीतरी जास्तीत येईल”, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. त्यामुळे राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर उद्या सविस्तर भूमिका मांडणार असल्याचं आजच स्पष्ट केलंय.

“तुम्ही गीतकार जावेद अख्तर यांचे पाकिस्तानमधील स्टेटमेंट ऐकणे गरजेचे आहे. तुम्ही आमच्या लता मंगेशकर यांना मानत नाहीत तर आम्ही का तुमच्या कलाकारांना मानू? या देशात इतकं टॅलेंट भरलेले आहे. तर ती पाकिस्तानी नरडी आपल्याला हवेत कशाला?”, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.