VIDEO : ‘मी त्यावेळच्या राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गियर टाकला होता’, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

"मी 2000 साली, ज्यावेळी एका वेगळ्या पक्षात होतो, त्यावेळेला त्या पक्षात जे काही राजकारण सुरु होतं त्याला कंटाळून मी एक रिव्हर्सचा गियर टाकला होता. मला असं वाटत होतं की, नको ते राजकारण. मला त्या राजकारणात जायचंच नाही", असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितलं.

VIDEO : 'मी त्यावेळच्या राजकारणाला कंटाळून रिव्हर्स गियर टाकला होता', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 11:55 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘एक नंबर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी राज ठाकरे यांनी चित्रपट क्षेत्राशी आपलं किती जवळचं नातं आहे हे सांगत असताना एक किस्सा सांगितला. “मी 2000 साली राजकारणाला कंटाळून मी रिव्हर्स गिअर टाकला होता”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. “साजिद नाडियाडवालांमुळे पुन्हा राजकारणात आलो”, असंही राज ठाकरे म्हणाले. “मला चित्रपटांची निर्मिती करायची होती”, असा किस्सा देखील राज ठाकरे यांनी यावेळी सांगितला.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

“मी 2000 साली, ज्यावेळी एका वेगळ्या पक्षात होतो, त्यावेळेला त्या पक्षात जे काही राजकारण सुरु होतं त्याला कंटाळून मी एक रिव्हर्सचा गियर टाकला होता. मला असं वाटत होतं की, नको ते राजकारण. मला त्या राजकारणात जायचंच नाही. माझी तशी इच्छाच नाहीय. मला असले गोंधळही घालायचे नव्हते. मला कोणते धक्केही द्यायचे नव्हते”, असं राज ठाकरे म्हणाले.

“मी राजकारण हळूहळू सोडत होतो. त्यावेळेला मी साजिद नाडियावाला अनेकदा भेटायचो आणि बोलायचो की, आपल्या फिल्म प्रोडक्शन सुरु करायचं आहे. मला फिल्म प्रोडक्शन सुरु करायचं आहे. मला फिल्म सुरु करायचं आहे, फिल्म प्रोड्यूस करायच्या आहेत, वगैरे वगैरे. एकेदिवशी मी पुन्हा राजकारणात वळण्याचं कारण हे साजिद नाडियावाला आहेत. हेही त्यांचं एक अंग आहे”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“त्यांनी मला फक्त गोष्ट सांगितली, राज भाई मी एक प्रोड्यूसर आहे. प्रोड्यूसर कशाप्रकारे काम करतात ते मला माहिती आहे. काय-काय करावं लागतं ते मला माहिती आहे. राज ठाकरेंना प्रोड्यूसर बनून ते करताना मी बघू शकणार नाही. तुम्ही जिथे आहात तिथेच राहा. चित्रपट बनत राहणार. त्यानंतर मी परत राजकारणात सक्रिय झालो आणि परत त्या गोष्टी सुरु झाल्या”, असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला.

बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.
मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत
मुसळधार पावसाचा मध्य आणि पश्चिम रेल्वेला फटका, लोकल विस्कळीत.
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?
'बाजारबुणगे, हिंमत असेल तर...', ठाकरेंचा कोणाला अप्रत्यक्षपणे इशारा?.
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?
'अक्षय शिंदे कोणी संत नव्हता, तो..', शर्मिला ठाकरे नेमक काय म्हणाल्या?.
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?
जरांगेंचं उपोषण स्थगित, सलग 8 दिवस उपोषण केल्यानंतर 9व्या दिवशी माघार?.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणी कोर्टाने केले 'हे' सवाल.
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं
'हे न पटण्यासारखं...', मुंबई हायकोर्टानं सरकारी वकिलांनाच फटकारलं.
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक...
मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली; शिंदे हा नालायक....
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान
'पवार-ठाकरे-काँग्रेसकडून लिहून घ्यावं...', फडणवीसांचं जरांगेंन आव्हान.