राणे प्रकरणात हाणामाऱ्या झाल्या, तेव्हा नियम कुठे होते?; राज ठाकरेंचा सवाल
सणांतून फक्त रोगराई पसरते. यात्रेतून नाही. यांच्या मेळाव्यातून आणि हाणामाऱ्यातून कोरोनाची लाट पसरली नाही. यांना पाहिजे तेवढं सुरू करतात, अशी टीका राज यांनी केली. (mns chief raj thackeray slams maha vikas aghadi over lockdown restrictions in maharashtra)

मुंबई: नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली. यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये हाणामाऱ्या झाल्या. तेव्हा कोरोना नव्हता का? जन आशीर्वाद यात्रा आणि हाणामाऱ्यांवेळी नियम कुठे गेले?, असा खणखणीत सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. (mns chief raj thackeray slams maha vikas aghadi over lockdown restrictions in maharashtra)
राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला चढवला. कोरोनाचे निर्बंध मुंबईतच का? बाहेरच्या राज्यांचं काय? जन आशीर्वाद यात्रा चालली तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही. सण आल्यावर लॉकडाऊन. सणांतून फक्त रोगराई पसरते. यात्रेतून नाही. यांच्या मेळाव्यातून आणि हाणामाऱ्यातून कोरोनाची लाट पसरली नाही. यांना पाहिजे तेवढं सुरू करतात, अशी टीका राज यांनी केली.
म्हणून दुसऱ्या, तिसऱ्या लाटेची भीती
गेल्या वर्षी दहीहंडी होती. पण साजरी केली नव्हती. गेल्यावेळची आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ हे पी साईनाथ यांचं पुस्तक आहे. तसं ‘लॉकडाऊन आवडे सरकारला’ असं सरकारचं झालं आहे. त्यात हजारो कोटींची कामे वाजवली जात आहेत. मोर्चे आंदोलन होऊ देत नाही. त्यामुळे वारंवार दुसरी, तिसरी लाट. चौथी लाट मुद्दामहून आणली जात आहे, असा दावा त्यांनी केला.
सणांवरच बंदी का?
सर्व गोष्टी सुरू आहेत. यांचे मेळावे सुरू आहेत. राणेंची यात्रा निघाली. त्यांच्यासोबत हाणामाऱ्या सुरू आहेत. भास्कर जाधवच्या मुलाने अभिषेक सुरू केला. त्यांना मंदिरं सुरू. आमच्यासाठी नाही. क्रिकेट सुरू आहे. बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी झाल्या नाहीत. त्यामुळे सणांवरच बंधन का?, असा सवाल त्यांनी केला.
अस्वल अंगावरचे केस मोजत नाही
मनसे पदाधिकाऱ्यांवर केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. त्याकडे राज यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर, अस्वलाच्या अंगावर केस किती हे अस्वल मोजत नाही. आम्हीही मोजत नाही. सूडबुद्धीनेच सुरू आहे. हे विरोधी पक्षात असते तर काय केलं असतं? असा सवाल त्यांनी केला.
नियम सर्वांना सारखेच हवे
मंदिरं उघडली गेलीच पाहिजे. आजचा दिवस होऊ दे, माझ्या लोकांच्या बैठका घेणार आहे. मंदिरं सुरू करा नाही तर मंदिरांसमोर घंटनाद करू. नियम लावायचे तर सर्वांना समान नियम लावा. याला एक त्याला एक असं करून चालणार नाही. यांची बाहेर पडायला फाटते याला आमचा काय दोष?, असा घणाघाती हल्लाही त्यांनी चढवला.
यांची हिंमत कशी होते?
ठाण्यात परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील. फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा यांना कळेल. यांची हिम्मत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत. तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिम्मत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल, असा इशाराही त्यांनी दिला. (mns chief raj thackeray slams maha vikas aghadi over lockdown restrictions in maharashtra)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 August 2021 https://t.co/KwVyAQYqAo #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 31, 2021
संबंधित बातम्या:
भाजपच्या भूमिकेला मनसेची पहिली साथ? मंदिर उघडण्यासाठी राज ठाकरे आक्रमक
तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष, राज ठाकरेंची सरकारवर जळजळीत टीका
(mns chief raj thackeray slams maha vikas aghadi over lockdown restrictions in maharashtra)