मुंबईत मनसेला धक्का, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज (16 जुलै) शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

मुंबईत मनसेला धक्का, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस आदित्य शिरोडकरांचा शिवसेनेत प्रवेश
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 9:11 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज (16 जुलै) शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जातोय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधी राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यात मनसेनेही दंड थोपटले आहेत. मात्र, त्याआधीच या पक्षांतराने मनसेची काळजी वाढवलीय.

आदित्य शिरोडकर म्हणाले, “मी माझी राजकीय कारकीर्द 2000 मध्ये सुरु केली होती, जेव्हा मी रुपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो. मी विद्यार्थी परिषद आणि रूपारेलच्या बीव्हीएस युनिटमध्ये सक्रिय होतो. माझी कॉलेजच्या जनरल सेक्रेटरी या पदावर निवड झाली होती. कॉलेजमध्ये असताना एस.यू.एस.ने शिवाजी पार्क येथे “लता मंगेशकर” शो आयोजित केला होता. त्यामध्ये मी सक्रिय सहभाग घेतला आणि या कार्यक्रमासाठी रूपारेल बीव्हीएस युनिटमधूनही काम पाहत होतो. हा कार्यक्रम “भुज” भूकंप मदत निधीसाठी आयोजित करण्यात आला होता.”

“मनसेत असताना राज्यभरातील विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी महाराष्ट्र दौरा”

“2005 मध्ये मी रुपारेल कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलो. त्यानंतर शिव उद्योग सेनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्यासाठी सक्रिय झालो आणि लोकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यास मदत केली. 9 मार्च 2006 मध्ये मनसे पक्षाची स्थापना झाली. मला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली. तेव्हा मी राज्यभरातील विद्यार्थ्यांना एकत्र करण्यासाठी महाराष्ट्र दौरा करुन विद्यार्थ्यांना एक जुट करण्यास सुरुवात केली,” असं आदित्य शिरोडकर यांनी सांगितलं.

“40,000 विद्यार्थी उपस्थितीत इंटर कॉलेजेट स्पर्धा घेतल्या”

शिरोडकर म्हणाले, “सभागृहामध्ये नाशिक, पुणे, ठाणे आणि मुंबई येथे संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांसाठी इंटर कॉलेजेट स्पर्धा घेण्यात आल्या. फायनल्स अंधेरी क्रीडा संकुलात होते. तेथे सुमारे 40,000 विद्यार्थी उपस्थित होते. त्या कार्यक्रमाचे नाव बॉल डान्स म्हणून होते. रविंद्र नाट्य मंदिरात सलग 5 वर्षे “फोकस” करिअर मेळावा आयोजित करण्यात आला होता. शिवाजी पार्क येथे “महाराष्ट्र धर्म” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील जाणकार प्रकाशक उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी सचिन तेंडुलकर, बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे होते.”

“सिनेट निवडणुकीत 2 सदस्य निवडून आणले, विद्यापीठ निवडणुकीतही (UR Election) यश”

“वरळी जम्बोरी मैदानावर करीअर फेअर “ज्ञानमय” मार्फत आयोजित करण्यात आले होते. जाणकार लोकांकडून मार्गदर्शनही करण्यात आले होते. दरवर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला. विविध विषयांकरिता मुंबई विद्यापीठावर आंदोलनं केली. सिनेट निवडणुकीत 2 सिनेट सदस्य निवडून आणले आणि विद्यापीठ निवडणुकीत (UR Election) यश मिळवले,” असं शिरोडकर यांनी सांगितलं.

आदित्य शिरोडकर यांचा राजकीय प्रवास कसा?

आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना ते म्हणाले, “2009 मध्ये जेव्हा नितीन सरदेसाई यांना विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहण्याची संधी दिली गेली. प्रथम मला विचारले गेले परंतु माझ्या वयामुळे मी पात्र नव्हतो (ही निवडणूक अगदी जवळून हाताळली). 2012 मध्ये पुणे कॉर्पोरेशनमध्ये 29 नगरसेवक निवडून आले, तेव्हा मी वडिलांसोबत याचा एक भाग होतो. संपूर्ण महाराष्ट्रात 2014 मध्ये शिक्षण परिषद घेतली. त्यात सध्याची शिक्षण व्यवस्था कशी जुनी झाली आहे आणि सध्याच्या परिस्थितीत तरूणांना तोंड देण्यासाठी कोणते बदल आवश्यक आहेत या विषयावर होती. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या ताज्या धोरणात आम्ही केलेल्या 45 टक्के संशोधनांचा समावेश आहे.”

“2014 मधील लोकसभा निवडणुकीत सुमारे 80,000 मते मिळवली. मुंबईतील मनसे पक्षाबांधणी माझ्या वडिलांनी आणि राज ठाकरेंनी केली होती. प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या शहरात “वर्धापन दिन” साजरा करायचो. माहीम दादर विधानसभेतील दहावी-बारावीमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व तसेच शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असतं,” असं त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

संजय राठोड आमचे दुश्मन नाहीत, शिवसेना तर बिलकुल नाही : चंद्रकांत पाटील

तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांची क्लीन चिट?

…तरीही भाजप पुढार्‍यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचंच आश्चर्य वाटतं, सामनातून टीकेचा बाण

व्हिडीओ पाहा :

MNS leader Aditya Shirodkar join Shivsena in presence of Uddhav Thackeray

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.