उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेच्या तरुण तडफदार नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान 13 दिवसांवर आलेलं असताना मनसेच्या तरुण नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे अनकेांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पक्षप्रवेशाने मनसेला वांद्रे पूर्वेत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना मोठा धक्का, मनसेच्या तरुण तडफदार नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 4:47 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज ठाकरेंना हा धक्का दिला आहे. मनसेचे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्र यांनी मनसेची साथ सोडत शिवसेना ठाकरे गटाचं शिवबंधन हाथी बांधलं आहे. अखिल चित्रे यांनी ठाकरे गटाची मशाल हाथी घेतली आहे. त्यामुळे मुंबईत स्थानिक पातळीवर विद्यार्थी संघटना आणि युवा सेना आणखी ताकदवान होणार आहे. अखिल चित्रे हे मनसेचे तडफदार नेते मानले जायचे. पण त्यांनी अचानक विधानसभेच्या काळात ठाकरे गटात प्रवेश केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्व मतदारसंघात मनसेकडून तृप्ती सावंत यांना विधानसभेचं तिकीट दिल्याने अखिल चित्रे नाराज असल्याची माहिती येत होती. अखेर त्यांनी मनसे पक्षालाच सोडचिठ्ठी दिली आहे. अखिल चित्रे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. “माझी राजकीय सुरुवात केली होती तेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेचा युनिट प्रमुख, कॉलेजप्रमुख म्हणून सुरुवात केली होती. मी ज्या ठिकाणाहून राजकारण सुरु केलं होतं अगदी त्याच ठिकाणावर परत यावं, असं मला वाटलं. त्यामुळे मी पुन्हा या पक्षात प्रवेश केला आहे”, असं अखिल चित्रे यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

अखिल चित्रे यांची नेमकी भूमिका काय?

“ज्या विचाराबरोबर मी गेल्या 18 वर्षांपासून होतो तो विचार आता माझ्या पूर्वीच्या पक्षातून बाजूला टाकण्यात आला आहे. राज ठाकरे आताच मागे म्हणाले होते की, मला दुसऱ्यांची मुलं अंगावर खेळवायची नाहीत. मला माझीच मुलं खेळवायची आहेत. माझ्यात ती क्षमता आहे. पण वांद्रे पूर्वेत चार पक्ष फिरुन आलेल्या महिलेला तिकीट देण्यात आलं. त्या इकडे निवडून येण्यासाठी आल्या नाहीत तर फक्त कुणालातरी पाडण्यासाठी उभ्या आहेत. अशा विचाराने राजकारण होत नाही. त्यामुळे मी आधी जिथे होते तिथे परत जावं असं मला वाटलं”, अशी भूमिका अखिल चित्रे यांनी मांडली.

“तृप्ती सावंत यांना उमेदवारी मिळाली म्हणून मी नाराज होतो असं नाही. वांद्रे पूर्वेत इच्छुकांची यादी होती. मनसेचे इतर जण उमदवारीसाठी इच्छुक असताना बाहेरुन आलेल्याला तिकीट दिलं. आपण जे म्हणतो तेच कॉन्ट्रॅटिक्ट करतो त्याला कंटाळून मी इथे आलो”, असं अखिल चित्रे म्हणाले.

अखिल चित्रे यांचं सूचक ट्विट

दरम्यान, अखिल चित्रे यांनी ठाकरे गटातील पक्षप्रवेशाआधीच ट्विट केलं होतं. “अखेर मला पक्षाबाहेर ढकलण्यात त्यांना यश आलं. खंत एकच की खंजीर समोरून नाही, मागून नाही तर शेजारी बसून खुपसला गेला. राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलं आहे सावध रहा. असो, जय महाराष्ट्र!”, असं अखिल चित्रे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
दिग्गज नेत्यांमध्ये कोणाचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ
Election Result भाजप, महायुतीची लाट नाही तर त्सुनामी, मविआचा सुपडा साफ.
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.