महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तडफदार नेते अमेय खोपकर यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया, ट्विटरवर दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तडफदार नेते अमेय खोपकर यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अमेय यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या पाठीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. त्यामुळे त्यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तडफदार नेते अमेय खोपकर यांच्या पाठीवर शस्त्रक्रिया, ट्विटरवर दिली महत्त्वाची माहिती
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 3:28 PM

मुंबई | 1 जानेवारी 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी नवीन वर्षाच्या निमित्ताने ट्विटरवर सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयाचे डॉक्टर आणि सर्जन यांच्यासह मित्रपरिवाराचे आभार मानले आहेत. “हिंदुजा रुग्णालयाचे निष्णात सर्जन, रुग्णालय कर्मचारी, माझे कुटुंबिय, मित्रपरिवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे या सर्वांचं पाठबळ लाभल्यामुळेच नवीन वर्षात मी नव्या उमेदीने सज्ज झालोय. माझ्या सर्व हितचिंतकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाच हेही सांगतो की माझ्या पाठीवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे आणि आता लवकरच ताठ मानेने मी तुमच्यासमोर येणार आहे. सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि सर्वांना नववर्षाभिनंदन”, असं अमेय खोपकर म्हणाले आहेत.

अमेय खोपकर हे चित्रपट निर्मातेदेखील आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच मराठी चित्रपटांसाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली आहे. त्यांनी मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईम शो मिळावा यासाठी केलेलं आंदोलन चांगलंच गाजलं होतं. याशिवाय त्यांनी अनेक सामाजिक मुद्द्यांवर आणि घटनांर रोखठोक भूमिका मांडली आहे. अमेय खोपकर हे राज ठाकरे यांच्या जवळचे नेत्यांपैकी एक मानले जातात. ते पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. राज्यात आणि देशात आगामी काळात निवडणुकांचा धुराळा असणार आहे. त्यामुळे अमेय खोपकर यांनी आजारपणातून लवकर बरे होऊन कामाला लागणं पक्षासाठी जास्त महत्त्वाचं आहे. खोपकर लवकरच आता बरे होण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुकांमध्ये मनेस महत्त्वाचा पक्ष

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मनसे हा पक्ष महत्त्वाचा ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रभावी नेते आहेत. त्यांचा संपूर्ण महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. त्यांचा पक्ष पर्यावरणापासून विविध क्षेत्रांसाठी तळागळात काम करताना दिसत आहे. विशेष म्हणजे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी मनसे सदैव तत्पर असताना दिसत आहे. मनसेने पुण्यात चांगलीच कंबर कसली आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर तिथे पोटनिवडणूक लागलेली नाही. विशेष म्हणजे आता लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचं बिगूल वाजू शकतं. या मतदारसंघात मनसेकडून जोरदार तयारी सुरु आहे. स्वत: राज ठाकरे सातत्याने या मतदारसंघात विविध कार्यक्रमांच्या निमित्ता जावून आले आहेत. याशिवाय मनसे नेते अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे या देखील पुण्यात पक्षबांधणीसाठी कामाला लागले आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.