अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या बैठकीतली आतली बातमी काय? बाळा नांदगावकर म्हणाले….

"मी दक्षिण मुंबईतून दोन वेळा लोकसभेची उमेदवारी लढवली होती. आताही राज ठाकरे म्हणाले की, तुला गडचिरोलीतून निवडणूक लढवायची आहे, तर मी गडचिरोली जावून उभा राहीन. कारण वर्षानुवर्षे आदेश ऐकण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि पुढची वाटचाल करतो", असं बाळा नांदगावकर म्हणाले.

अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या बैठकीतली आतली बातमी काय? बाळा नांदगावकर म्हणाले....
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 7:07 PM

मुंबई | 19 मार्च 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मनसे-भाजप युतीवर चर्चा झाली. या भेटीनंतर राज ठाकरे आज संध्याकाळी मुंबईत आले. राज ठाकरे घरी परतल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले. तिथे त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत अमित शाह यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती घेतली. राज ठाकरे यांच्याशी बातचित केल्यानंतर बाळा नांदगावर शिवतीर्थ बंगल्याच्या बाहेर आले. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अमित शाह आणि राज ठाकरे यांच्या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याची प्रतिक्रिया दिली.

“राज ठाकरे काल दिल्लीला गेले होते ही गोष्ट खरी आहे. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे होते. त्यांची आणि अमित शाह यांची भेट झाली. त्यानंतर ते आज पुन्हा मुंबईला आले आहेत. राज ठाकरे आणि अमित शाह यांच्यात एकंदरीत सकारात्मक चर्चा झालेली आहे. आणखी एखादी बैठक होईल. त्यानंतर त्याबाबतचा निर्णय बाहेर पडेल. त्यामुळे फलदायी चर्चा झाली, एवढंच मी तुम्हाला आज सांगू शकेन”, अशी प्रतिक्रिया बाळा नांदगावकर यांनी दिली.

‘नेमक्या सीट किती मिळाव्यात याबाबत चर्चा’

“मी त्या बैठकीला स्वत: नव्हतो. राज ठाकरे त्या बैठकीत होते. त्यामुळे सकारात्मक चर्चा झालेली आहे. एक-दोन दिवसांत त्याबाबत माहिती येईल. आता लोकसभेची निवडणूक असल्यामुळे लोकसभेची चर्चा चालू आहे. आमच्याकडून फॉर्म्युला वगैरे असं काही नाही, नेमक्या सीट किती मिळाव्यात याबाबतची भावना आहे, त्यावर राज ठाकरेंनी अमित शाह यांना काही सांगितलं आहे. त्यावर काही माहिती आली की तुम्हाला दोन दिवसांनी सांगू”, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवणार?

दक्षिण मुंबईतून आपल्याला उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरु आहे. हे खरं आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी बाळा नांदगावकर यांना विचारला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “हा पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा अधिकार आहे. कुणाचं नाव द्यायचं, कुणाचं नाही द्यायचं या विषयी आमच्यात काहीच चर्चा झालेली नाही. वरिष्ठ पातळीवर मात्र चर्चा झालेली आहे”, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली.

‘राज ठाकरेंना उद्या पुन्हा भेटणार’

“मी दक्षिण मुंबईतून दोन वेळा लोकसभेची उमेदवारी लढवली होती. आताही राज ठाकरे म्हणाले की, तुला गडचिरोलीतून निवडणूक लढवायची आहे, तर मी गडचिरोली जावून उभा राहीन. कारण वर्षानुवर्षे आदेश ऐकण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि पुढची वाटचाल करतो. राज ठाकरे आणि आम्ही उद्या पुन्हा भेटणार आहोत. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा होईल”, अशी देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

संजय राऊत यांच्यावर निशाणा

यावेळी बाळा नांदगावकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. “बाळा नांदगावकर हे सतत मीडियामध्ये असल्यामुळे त्यांनी काय बोलावं हे विचार करुन बोलायला पाहिजे. ज्याने त्याने आपल्या पक्षाविषयी बोलावं. दुसऱ्या पक्षावर टीका करत असताना आपण कितपत योग्य टीका करतोय याचा विचार करायला हवं. मीडियासमोर आलं म्हणून काहीही बोलायचं असं होत नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही काय भूमिका घेत आहोत. ते काय बोलतात त्याला आमच्या दृष्टीने काही महत्त्व देत नाहीत”, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.