मनसेची पूरग्रस्तांसाठी मिठापासून ताटापर्यंत मदत; बाळा नांदगावकरांनी कोकणात पाठवले चार ट्रक
कोकणात आलेल्या महापुराने शकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. (bala nandgaonkar)
मुंबई: कोकणात आलेल्या महापुराने शकडो नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही कोकणातील पूरग्रस्तांसाठी मोठी मदत पाठवली आहे. अगदी मिठापासून ताटापर्यंत आणि टी-शर्टापासून शर्टापर्यंतची मदत सामुग्री असलेले चार ट्रक बाळा नांदगावकर यांनी कोकणात पाठवले आहेत. (mns leader bala nandgaonkar send four trucks kits for flood-hit konkan)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून असंख्य महाराष्ट्र सैनिकांचे मदतीचे हात पुढे आले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवडी-भायखळा विधानसभा तसेच एकलव्य फाऊंडेशनच्या अध्यक्षा सृष्टी नांदगावकर यांच्यावतीने सहाय्यता सामुग्री पूरग्रस्त भागात लोकांना सुपूर्द करण्यात येणार आहे.
जमेल तेवढी मदत करा
पूरग्रस्तांना सहाय्यता सामुग्रीमध्ये पॅक केलेले अन्न, प्रथमोपचार किट, ब्लँकेट, कपडे, सुका खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या, भांडीकुंडी, बाटल्या अशा कुटुंबाला जीवनउपयोगी वस्तू पूरग्रस्त भागातील लोकांना मदत म्हणून देण्यात येणार आहेत. पूरग्रस्त भागातील गरजू लोकांना मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे जमेल तेवढी मदत करण्याचे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर केले आहे.
ज्या गावात मदत पोहोचली नाही, तिथे जा
पूरग्रस्तांच्या अडचणीच्या काळात धावून जा, असं आपल्याला राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीला जा. पण ही मदत करताना आपल्यामुळे कुणाला अडथळा येऊ नये. आपल्यामुळे कुणाची अडचण होऊ नये,असं त्यांनी सांगितलं. एकलव्य ट्रस्टच्या वतीने गृहउपयोगी वस्तूंनी भरलेले साधारण दोनचार ट्रक आम्ही पूरग्रस्तांसाठी पाठवत आहोत. घरातील प्रत्येक गोष्ट म्हणजे मिठापासू ताटापर्यंत, टी-शर्टपासून शर्टापर्यंत आणि अन्नधान्य, कडधान्य, टूथपेस्ट, साबण, तेल घराला लागणारी प्रत्येक गोष्ट या ट्रकमधून पाठवण्यात येत आहे. तसेच पूरग्रस्तांना मदत करताना ज्या गावात मदत पोहोचली नाही किंवा पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी आधी जाऊन मदत करा. त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, असं आवाहनही नांदगावकर यांनी मनसे कार्यकर्त्यांना केलं. (mns leader bala nandgaonkar send four trucks kits for flood-hit konkan)
VIDEO | 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 28 July 2021 https://t.co/HLdcXueajU #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 28, 2021
संबंधित बातम्या:
मराठमोळ्या दीपाली सय्यदची बॉलिवूडकरांना चपराक, भुदरगडमध्ये जाऊन तब्बल 10 कोटींची मदत
(mns leader bala nandgaonkar send four trucks kits for flood-hit konkan)