मुंबईत डान्सबारमध्ये तरुणींवर पैशांची उधळपट्टी, मनसे नेत्याकडून धक्कादायक VIDEO शेअर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नयन कदम यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर संबंधित व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला.

मुंबईत डान्सबारमध्ये तरुणींवर पैशांची उधळपट्टी, मनसे नेत्याकडून धक्कादायक VIDEO शेअर
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 9:47 PM

मुंबई : मुंबईत बारमध्ये मुली नाचवणं आणि त्यावर पैशांची उधळपट्टी करणं यास कायद्याने बंदी आहे. असं असताना महाराष्ट्राची राजधानी अशी ख्याती असलेल्या मुंबई शहरात सर्रासपणे डान्सबार सुरु असल्याचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे डान्सबारचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि संबंधित डान्सबार तोडावा का? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आलाय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नयन कदम यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर संबंधित व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्र्यांना इशारा दिला होता. कदम यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत काही तरुणी डान्सबारमध्ये नाचताना दिसताहेत आणि तिच्यावर काही तरुण पैशांची उधळपट्टी करताना दिसत आहेत.

नयन कदम यांनी व्हिडीओसोबत मुख्यमंत्र्यांना डान्सबार तोडू का? असा प्रश्न विचारलाय. “बोरिवलीत कस्तुरबामार्ग हद्दीत क्लब 9, चारवॉक, पार्कसाईड बार येथे सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत पैशांची उधळण, अश्लील नृत्य सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठाण्यात 13 बार तोडले, आता बोरीवलीत आम्ही बार तोडावे का?”, असा सवाल करत नयन कदम यांनी टोला लगावलाय.

नयन कदम यांनी शेअर केलेला व्हिडीओ चांगलाच तुफान व्हायरल झाला. तसेच या व्हिडीओची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली. पण त्यानंतर थोड्या वेळात संबंधित व्हिडीओ नयन कदम यांच्या अकाउंटवरुन हटवण्यात आला.

दरम्यान, संबंधित व्हिडीओ प्रकरणी पोलीस खरंच पडताळणी करतात का, व्हिडीओ खरा असेल तर संबंधित बारवर कारवाई करतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.