मध्यरात्री राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीस अज्ञात स्थळी भेटले, त्या अर्ध्या तासाच्या बैठकीत…

lok sabha election 2024 | अमित शाह यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीवरुन मुंबईत येण्यासाठी निघाले. सुमारे बुधवारी रात्री ११.१५ वाजता देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्याचवेळी राज ठाकरे शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानावरुन बाहेर पडले.

मध्यरात्री राज ठाकरे अन् देवेंद्र फडणवीस अज्ञात स्थळी भेटले, त्या अर्ध्या तासाच्या बैठकीत...
raj thackeray devendra fadnavis
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 8:41 AM

मुंबई | 21 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांमध्ये वेगवान घडामोडी सुरु आहेत. नवीन मित्र जोडण्याचे काम सुरु आहेत. युती अन् आघाड्यांसाठी चर्चा होत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर महायुतीत मनसे येणार असल्याची चर्चा सुरु झाली. मनसेला दोन किंवा तीन जागा मिळण्याबाबत चर्चा सुरु आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मध्यरात्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली. ही भेट अज्ञातस्थळी झाली. सुमारे ३० ते ४५ मिनिटे दोन्ही नेते एकत्र होते. यामुळे या प्रकारबद्दल उत्सुक्ता वाढली आहे.

कुठे झाली ही भेट

अमित शाह यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस नवी दिल्लीवरुन मुंबईत येण्यासाठी निघाले. सुमारे बुधवारी रात्री ११.१५ वाजता देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्याचवेळी राज ठाकरे शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानावरुन बाहेर पडले. दोन्ही नेते मुंबई विमानतळ ते लोअर परले दरम्यान अज्ञात स्थळी भेटले. रात्री ११.३० ते १२.१५ दरम्यान अर्धा ते पाऊन तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर १२.३० वाजता राज ठाकरे पुन्हा शिवतीर्थावर परतले. मध्यरात्री झालेल्या या बैठकीची जोरदार चर्चा आता सुरु झाली आहे.

राज ठाकरे यांनी बोलवली बैठक

मनसे नेते राज ठाकरे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत उमेदवार दिला नव्हता. परंतु यंदा गेल्या काही महिन्यांपासून राज ठाकरे लोकसभेसाठी जोरदार तयारी करत आहेत. आता अमित शाह यांच्या भेटीनंतर त्यांनी पक्षातील लोकांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत भाजपसोबत युती करण्याबाबत चर्चा होणार आहे. यामुळे महायुतीत मनसे येण्याचा निर्णय एक-दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

मनसेला लोकसभेचा कोणत्या जागा मिळणार? याकडे मनसे सैनिकांचे लक्ष लागेल आहे. लोकसभेच्या १३ मतदार संघात मनसेचे अस्तित्व आहे. यामुळे महायुतीत मनसे आल्यानंतर या ठिकाणी फायदा होणार आहे. मनसेला मुंबई, शिर्डी किंवा नाशिकमधील एक लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.