Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी (Santosh Dhuri) यांचा अटकपूर्व जामीन (MNS leader gets Pre Arrest bail sanction) अर्ज मंजूर करण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयानं हा जामीन मंजूर केला आहे. अटकपूर्व जामीन दिल्यानंतर आता संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी यांना पोलीस चौकशीला सहकार्य करावं लागणार आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यालायानं मोठा दिलासा दिला आहे. सरकारी कामात अडथळ आणल्याप्रकरणी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर अटक करण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेल्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा कोणताही थांगपत्ता पोलिसांना लागू शकलेला नव्हता. अखेर आता जामीन मंजूर झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी समोर येण्याची शक्यता आहे.
दादरमध्ये पोलिसांना चकवा देत संदीप देशपांडे यांनी पळ काढला होता. यातमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापतही झाली होती. गाडीतून पसार झालेल्या संदीप देशपांडेवर यामुळे कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात होती. त्यानंतर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आलेला होता.
पाहा व्हिडीओ :
अटकेच्या भीतीनं गायब
भोंग्याविरोधातील आंदोलनातून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पळ काढला होता. या धावपळीत एक महिला पोलीस पडल्याने तिच्या डोक्याला मार लागला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून हे दोन्ही नेते गायब झाले होते.
नेमकं शिवाजी पार्कमध्ये काय घडलं होतं? पाहा व्हिडीओ
संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला युक्तीवाद आधीच पूर्ण झाला होता. मात्र मुंबई सत्र न्यायालयानं या अटकपूर्व जामीनावरील निकाल राखून ठेवला होता. अखेर आज हा निकाल जाहीर करता संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे. मात्र हा दिलासा देताना आता संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांच्याचौकशीला सामोरं जाताना सहकार्य करावं लागणार आहे.