राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, जातीय राजकारणावरुन संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची घणाघाती टीका केली.
मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर महाराष्ट्रात जाती पातीच्या राजकारणाची सुरुवात झाल्याचा आरोप केला. याचं समर्थन करताना देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याची घणाघाती टीका केली.
संदीप देशपांडे म्हणाले, “राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले 20 वर्षे बघत आहे. राष्ट्रवादीनं जे केलं ते राज ठाकरे बोलले आहेत, यात चुकीचं काही नाही.”
Video | पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं, Sandeep Dashpande यांची राष्ट्रवादीवर टीका#SandeepDeshpande #MNS #NCP #SharadPawar #RajThackeray
अन्य बातम्या, व्हिडीओ पाहा – https://t.co/BV9be230nv pic.twitter.com/rRCNgbDWvJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 17, 2021
“आज जे बोलत आहेत त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल”
यावेळी संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका करणाऱ्या प्रवीण गायकवाड यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. जे कोणी आता राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलत आहेत त्यांना योग्य उत्तर दिलं जाईल, असं मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं. तसेच या पुढील भूमिका राज ठाकरे ठरवणार असल्याचंही स्पष्ट केलं.
“लोकलबाबत निर्णय झाला, पण अनेकांना पास मिळत नाहीत”
संदीप देशपांडे म्हणाले, “लोकलबाबत निर्णय झाला, पण अनेकांना पास मिळत नाहीत. दुसरा डोस अनेकांना मिळाला नाही. फक्त पास नको, तिकीट पण द्या. मुंबईत लस केंद्रं बंद ठेवली आहेत.”
हेही वाचा :
राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचे आकलन नाही, संभाजी ब्रिगेडचा पहिला वार
लायकीत राहा, नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू; मनसेचा प्रवीण गायकवाडांना दम
राजसाहेब, गजानन काळेंची मनसेतून तात्काळ हकालपट्टी करा, तृप्ती देसाईंची आक्रमक मागणी
व्हिडीओ पाहा :
MNS leader Sandeep Deshpande criticize NCP over caste politics in Maharashtra