हाताला फ्रॅक्चर, पायाला मार, पक्षाचा नेता पाठी खंबीर उभा; डिस्चार्ज नंतर संदीप देशपांडे म्हणाले, या मागे कोण…

पोलिसांनी आजच्या आज हल्लेखोरांना अटक केली पाहिजे. ज्यांनी हल्ला केला आणि ज्यांनी करायला सांगितला त्यांचा शोध घ्या. हल्लेखोरांना अटक केली नाही तर काय होईल याची जबाबदारी ही पोलिसांची राहील.

हाताला फ्रॅक्चर, पायाला मार, पक्षाचा नेता पाठी खंबीर उभा; डिस्चार्ज नंतर संदीप देशपांडे म्हणाले, या मागे कोण...
sandeep deshpande Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 03, 2023 | 10:50 AM

मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे प्राणघातल हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आलं होतं. रुग्णालयात त्यांच्या हातावर प्लास्टर करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर येताच संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही कुणाला घाबरत नाही. घाबरणार नाही. माझ्यावर हल्ला करण्यामागे कोण लोक आहेत. हे सर्वांना माहीत आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले. मात्र, हल्लेखोर कोण आहेत? त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे संदीप देशपांडे यांनी सांगितलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

संदीप देशपांडे यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर संदीप देशपांडे व्हिलचेअरवर बसून रुग्णालयाच्या बाहेर आले. त्यांच्या हाताला फ्रॅक्चर झालेलं होतं. त्यामुळे एका हाताला प्लास्टर करण्यात आलं होतं. त्यांच्या भोवती मनसे नेते, पदाधिकाऱ्यांची प्रचंड गर्दी होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही पाठी उभे होते. काही महिला देशपांडे यांच्या प्रकृतीची विचारपूस करत होत्या. त्यानंतर देशपांडे उभे राहिले. त्यांनी एक हात उंचावून कार्यकर्त्यांना अभिवादन केलं. त्यानंतर कारमध्ये बसून घरी जायला निघाले.

हे सुद्धा वाचा

कुणालाही घाबरत नाही

घरी जाण्यापूर्वी संदीप देशपांडे यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही कुणाला घाबरत नाही. घाबरणार नाही. आम्ही कुणाला भीक घालत नाही. आम्हाला घाबरवण्याचा कुणी प्रयत्न करू नये. यात कोण लोक आहेत सर्वांना माहीत आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले. संदीप देशपांडे यांनी थेट कुणाचंही नाव घेतलं नाही. हल्ल्यामागे कोण लोक आहेत असं विचारल्यावर त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. हल्ल्याचं कारण काय हे सुद्धा त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मनसे नेत्यांकडून विचारपूस

दरम्यान, संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी मनसेच्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, नितीन सरदेसाई यांच्यासह भाजप नेते नितेश राणे आणि शिवसेना नेते सदा सरवणकर आदींनी संदीप देशपांडे यांची विचारपूस केली.

तात्काळ अटक करा

दरम्यान, मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी भ्याड हल्ल्याचा निषेध केला. पोलिसांनी आजच्या आज हल्लेखोरांना अटक केली पाहिजे. ज्यांनी हल्ला केला आणि ज्यांनी करायला सांगितला त्यांचा शोध घ्या. हल्लेखोरांना अटक केली नाही तर काय होईल याची जबाबदारी ही पोलिसांची राहील. मनसे सैनिक संतापलेले आहेत. त्यामुळे हल्लेखोरांना अटक करा. गुन्हेगार सापडले पाहिजे, असं ते म्हणाले. तसेच संदीप देशपांडे यांच्या हाताला फ्रॅक्चर आहे. उपचार करून त्यांना घरी पाठवलंय, अशी माहिती नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.