मनसेचा गुजरातकडे मोर्चा, ‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, मग अहमदाबादचं नाव कधी बदलणार?’

मनसेकडून डोंबिवलीत फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला जात आहे. त्याचवेळी गुजरातमधील अहमदाबाद शहराच्या नावावरुन येथील भाजप सरकारला घेरले जात आहे. औरंगबादचे नाव छत्रपती संभाजीनगर झाले मग अहमदाबादचे नाव केव्हा बदलणार? असा प्रश्न उपस्थित केलाय.

मनसेचा गुजरातकडे मोर्चा, 'औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं, मग अहमदाबादचं नाव कधी बदलणार?'
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 6:48 PM

सुनील जाधव, डोंबिवली : औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. राज्यातील भाजप व शिवसेना सरकारने हे काम केले. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये २५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रात औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असं बदललं. मग गुजरातमधल्या अहमदाबादचं  नाव अजूनही का आहे? यासंदर्भात गुजरातमधील नागरीक मनसे प्रमुख राज ठाकरे यांना साद घालत आहे. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदलावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.

काय केली मागणी

गुजरातमधील लोक एका तलावावर मुस्लिमांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत स्थानिक भाजप सरकारऐवजी राज ठाकरे यांना साद घालत आहेत. कारण राज ठाकरे यांनी माहीम येथील समुद्रातील अतिक्रमणाचा विषय काढला आणि ते तोडण्यात आले. राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चालत आहेत. यामुळे गुजरातमधूनही त्यांना साद घातली गेली आहे. तिथल्या लोकांच्या त्यांच्याकडे अपेक्षा आहेत, असे राजू पाटील यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

फेरीवाला अतिक्रमण

मनसेने फेरीवाला विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. महापालिका प्रशासनाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम मनसेने दिला होता. आज हे 15 दिवस होत असून आता मनसेकडून डोंबिवली स्टेशन (पूर्व) परिसर फेरीवालामुक्त करण्याची डेडलाईन संपली…आता आमच्याकडे दुर्लक्ष करा ! असा आशयचा बॅनर लावण्यात आहे.

आमदार राजू पाटील यांनी डोंबिवली स्टेशन परिसराची पाहणी करत प्रभाग अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतले. कारवाईबाबत अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरणानंतर आमदार राजू पाटील संतापले. हप्त्याची लाईन काढून दाखवू का ? कोण हप्ते गोळा करतात ते दाखवू का ? राजीनामा द्याल का ? लगेच बोलवतो. कोण किती घेतो नंतर कसं वाटप होतं, बोलवू का अशा शब्दात अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली.

यामुळे आक्रमक

पालिका प्रशासनाला पत्र देऊन कारवाई होत नसल्याने पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिल्यानंतर आमदार रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांचा फेरीवाल्यासोबत लागेबांध असल्याचा आरोप केला. हप्तेखोरी असल्याशिवाय अशा प्रकारची पद्धत राहणार नाही, असे त्यांनी म्हटलेय. सहा महिन्यात फक्त तीन फेरीवाल्यांवर कारवाई केली. मग या अधिकाऱ्यांची धिंड काढायची नाही का? असा सवाल आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला.

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.