उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीत सहज फेरफटका मारावा, म्हणजे खड्डे भरले जातील, मनसेचा टोला

किमान त्यामुळे कल्याण-शीळ मार्गावरचे खड्डे भरले जातील, असं आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे. (MNS MLA Raju Patil On Dombivali Potholes problem)

उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीत सहज फेरफटका मारावा, म्हणजे खड्डे भरले जातील, मनसेचा टोला
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 12:37 PM

डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील रस्त्यावरचे खड्ड्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे  तीन तास वाहनचालकांना वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागते. या ठिकाणी आतापर्यंत खड्डे बुजवण्याचे काम झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाण्याप्रमाणेच डोंबिवलीतही सहज फेरफटका मारावा, किमान त्यामुळे तरी कल्याण-शीळ मार्गावरचे खड्डे भरले जातील, असं उपरोधिक आवाहन मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं आहे.(MNS MLA Raju Patil On Dombivali Potholes problem)

“उद्धव ठाकरे ठाण्यात येणार म्हणून त्यांच्या मार्गातील रस्ते खड्डेमुक्त केले. माझी विनंती आहे की आपण डोंबिवलीत पण सहज एक फेरफटका मारावा, किमान कल्याण-शीळ रोडवरचे खड्डे तरी भरले जातील. पाहिजे तर मी स्वत: शिळफाट्यावर स्वागतासाठी उभा राहतो,” असे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबई, ठाण्यात रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळत आहे. काल (24 ऑगस्ट) उद्धव ठाकरेंनी ठाणे महापालिकेत आढावा बैठकींसाठी हजेरी लावली. या पार्श्वभूमीवर ठाण्यातील काही रस्ते चकाचक करण्यात आले. मुख्यमंत्री ज्या ज्या रस्त्यावरुन जाणार आहेत, त्या सर्व रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यात आले.

विशेष म्हणजे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: उभं राहून रस्त्यावर राहून खड्डे बुजवून घेतले. मुख्यमंत्री ज्या रस्त्यावरुन प्रवास करणार आहेत केवळ त्याच रस्त्यावरील खड्डे बुजवले असल्याचे बोललं जात आहे. मात्र इतर रस्त्यांकडे कोणीही अद्याप लक्ष दिलेले नाही. त्यामुळे इतर रस्त्यांचे काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित केले जात आहे.

गाफिल राहू नका, ठाणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सूचना

दरम्यान काल ठाणे महापालिकेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी  प्रशासनाला काही सूचना केल्या.“लॉकडाऊननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथीलता दिली आहे. तसेच दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करावे तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करावे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तीक आणि सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याच्या सूचना त्यांना प्रशासनाला केल्या.” (MNS MLA Raju Patil On Dombivali Potholes problem)

संबंधित बातम्या : 

दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न, पण गाफिल राहू नका, ठाणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबईत आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात, निदान लवकर करणं शक्य

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.