डोंबिवलीत 12 तास पाण्यात उभे राहुन जलआंदोलन, मनसेच्या आंदोलनास राष्ट्रवादी अन् सत्तेत असणाऱ्या शिवसेनेची साथ
dombivli ulhas river: उल्हास नदी ही कल्याण-डोंबिवलीतील लाखो नागरिकांची जीवनदायिनी आहे. केडीएमसीकडून या नदीचे पाणी उचलून नागरिकांना पुरवले जाते. मात्र नदी शेजारी असलेल्या कंपन्यांकडून आणि पालिकेकडून केमिकलयुक्त पाणी नदीत टाकले जाते.

डोंबिवली-उल्हानगरची जीवनदायिनी नदी असलेली उल्हास नदीच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन सुरु झाले आहे. 12 तास पाण्यात उभे राहून मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलना दरम्यान पाण्याचा एक थेंब त्यांनी घेतला नाही. त्यांच्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि सत्तेत असलेली शिवसेनासुद्धा उतरली आहे. गुरुवारी सकाळी सात वाजेपासून त्यांचे आंदोलन सुरु झाले आहे.
स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी आंदोलन
मनसे, राष्ट्रवादी आणि सत्तेत असलेल्या शिवसेना माजी नगरसेवकांनी पहाटे सात वाजल्यापासून पाण्यात उभे राहून उल्हास नदी बचाव आंदोलन सुरु केले आहे. या नदीत होणाऱ्या प्रदूषणामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शासकीय कार्यालय व महानगरपालिका आणि प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु प्रशासनाकडून दाखल घेतली गेली नाही. त्यामुळे मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी उल्हास नदीच्या प्रदूषणासाठी आंदोलन सुरु केले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाण्यात उभे राहून आंदोलनास सुरुवात केली. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी देखील पाण्यामध्ये उभे राहून आंदोलन केले.

dombivli ulhas river
केमिकलयुक्त पाणी नदीत
उल्हास नदी ही कल्याण-डोंबिवलीतील लाखो नागरिकांची जीवनदायिनी आहे. केडीएमसीकडून या नदीचे पाणी उचलून नागरिकांना पुरवले जाते. मात्र नदी शेजारी असलेल्या कंपन्यांकडून आणि पालिकेकडून केमिकलयुक्त पाणी नदीत टाकले जाते.




तसेच नाल्याचे पाणी नदीत सोडले जात असल्याने दूषित पाण्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे तिन्ही नगरसेवकांनी जल आंदोलनाला सुरुवात केली. नितीन निकम तब्बल 12 तास पाण्यात उभे राहून पाण्याचा एक थेंब पिता आंदोलन करणार आहे. या आंदोलनाद्वारे नितीन निकम प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता प्रशासन त्यांच्या आंदोलनाला कसे प्रतिसाद देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले