‘मराठी नंबर प्लेटवर कारवाई, ही मातृभाषेची गळचेपी’, मनसे आमदाराचे अनिल परबांना पत्र

महाराष्ट्रात विविध गाड्यांवर मराठी भाषेत नंबर प्लेट लावलेल्या आहेत. सदर गाड्यांवर आरटीओकडून कारवाई करुन दंड वसुली करण्यात येत आहे (MNS Raju Patil letter to Anil Parab).

'मराठी नंबर प्लेटवर कारवाई, ही मातृभाषेची गळचेपी', मनसे आमदाराचे अनिल परबांना पत्र
राजू पाटील, आमदार, मनसे
Follow us
| Updated on: Jan 12, 2021 | 6:49 AM

मुंबई : महाराष्ट्रात विविध गाड्यांवर मराठी भाषेत नंबर प्लेट लावलेल्या आहेत. सदर गाड्यांवर आरटीओकडून कारवाई करुन दंड वसुली करण्यात येत आहे. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी भाषेतील नंबर प्लेटवर कारवाई होत असल्याने मराठी जनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबतचा कायदा तयार करुन मराठी नंबर प्लेटला मान्यता द्यावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्राद्वारे केली आहे (MNS Raju Patil letter to Anil Parab).

“मराठी भाषा संवर्धन आणि मराठी अस्मिताबाबत माजी परिवहन नेते दिवाकर रावते आणि ज्येष्ठ नेते दिवाकर रावते सभागृहात आणि विविध स्तरावर वेळोवेळी आग्रही भूमिका घेताना दिसले. त्यांनीच 2016 मध्ये वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत दुचाकीसह सर्व गाड्यांवर मराठी प्लेट लावण्याबाबत भूमिका जाहीर केली होती. आजही सदर व्हिडीओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. पण आज अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे की, महाराष्ट्रात मराठी अस्मिता जपणाऱ्यांवर कारवाई करुन सरकार दंड वसूल करीत आहे”, अशी भूमिका त्यांनी पत्रात मांडली आहे.

“वास्तविक महाराष्ट्रासाठी मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्याबाबत राज्य सरकार आग्रही असले पाहिजे होते. तसा महाराष्ट्रात कायदाच केला पाहिजे होता. पण तसे न करता सरकारकडून मराठी नंबर प्लेटवर कारवाई करुन सोयीस्कर आपल्याच मातृभाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशाप्रकारे मराठी भाषेची सरकारकडूनच गळचेपी होत असेल तर भाषेचे संवर्धन आणि आपली मराठी अस्मिता कशी जपली जाईल? असा प्रश्न निर्माण होतो”, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

“आपण याबाबत तातडीने दखल घेऊन मराठी नंबर प्लेटवर होत असलेली कारवाई थांबवावी. मराठी भाषेत नंबर प्लेट लावण्यास परवानगी नसेल तर तातडीने तसा कायदा करुन परवानगी द्यावी आणि महाराष्ट्रातच मराठी भाषिकांची होत असलेली गळचेपी थांबवावी”, अशी विनंती त्यांनी अनिल परब यांना पत्राद्वारे केली (MNS Raju Patil letter to Anil Parab).

राजू पाटील यांनी याबाबत गुजराती भाषेत उपरोधिकपणे ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मुंबई, महाराष्ट्राबाबतचा अहंकार, मराठीबाबतही दाखवा’, असं राजू पाटील ट्विटरवर म्हणाले आहेत.

हेही वाचा : सत्तेत राहून आंदोलन करायचे, दुसऱ्या बाजूला बारामतीला जाऊन गोड चहा घ्यायचा, सदाभाऊ खोत यांचा घणाघात

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.