VIDEO: राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला, काही महिला अडकल्या; गोरेगावात मनसेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते गोरेगावातील मनसे शाखेचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला. राज ठाकरे स्टेजवर येत असताना कार्यकर्त्यांनीही स्टेजवर धाव घेतली.

VIDEO: राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला, काही महिला अडकल्या; गोरेगावात मनसेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी
राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला, काही महिला अडकल्या; गोरेगावात मनसेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 1:32 PM

समीर भिसे, मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray)  यांच्या हस्ते गोरेगावातील मनसे शाखेचं (mns sakinaka) उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर एक छोटेखानी समारंभ पार पडला. राज ठाकरे स्टेजवर येत असताना कार्यकर्त्यांनीही स्टेजवर धाव घेतली. एकाच वेळी असंख्य कार्यकर्ते स्टेजवर आल्याने स्टेज कोसळला. (stage collapse)  स्टेजचा मधला भाग अचानक खचल्याने त्यात काही महिला अडकल्या. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. मनसे कार्यकर्त्यांनी तातडीने या महिलांना बाहेर काढलं. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. कुणालाही दुखापत झाली नाही. राज ठाकरे स्टेजच्या पुढे होते त्यामुळे त्यांनाही काही झालं नाही. ही घटना घडल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं आणि काळजी घ्या असं कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी कार्यक्रम सुरू ठेवला. यावेळी त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले.

गोरेगाव येथे शाखा क्रमांक 40चं राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. राज ठाकरे येणार असल्याने गोरेगावात हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यावेळी एक भव्य स्टेजही उभारण्यात आला होता. राज ठाकरे आल्यानंतर त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. राज यांनी शाखेचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते स्टेजवर चढले. स्टेजवर आल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांना हात उंचावून नमस्कार केला. राज ठाकरे यांच्या मागोमाग असंख्य कार्यकर्तेही स्टेजवर चढले. महिला कार्यकर्त्याही स्टेजवर चढल्या. त्यामुळे स्टेजवर एकच गर्दी झाली आणि स्टेजचा मधला भाग अचानक कोसळला. त्यामुळे यात महिला अडकल्या गेल्या. पण मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ धाव घेऊन या महिलांना बाहेर काढलं.

पत्रकारांना धक्काबुक्की

स्टेज कोसळला तेव्हा राज ठाकरे हे स्टेजच्या पुढच्या भागात होते. त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच स्टेज कोसळल्यानंतर अडकलेल्या महिलांनाही कोणतीही दुखापत झाली नाही. राज ठाकरे यांनी या महिलांना काळजी घ्या असं सांगत त्यांना दिलासा दिला. स्टेज कोसळल्यानंतर मीडियाचे प्रतिनिधी हे दृश्य टिपण्यासाठी पुढे सरसावले असता मनसे कार्यकर्त्यांनी या पत्रकारांनाही धक्काबुक्की केली. माध्यमांनी चित्रीकरण करू नये म्हणून ही धक्काबुक्की केली. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती झाली होती. त्यामुळे पोलिसांना हस्तक्षेप करून जमाव पांगवावा लागला.

राज काय म्हणाले?

यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तिथीनुसारच शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन केलं. आपल्याकडे जेवढे सण येतात, मग ती दिवाळी, गणपती जेवढे काही सण येतात ते आपण तिथीने साजरे करतो. तारखेने साजरे करत नाही. गेल्यावर्षी दिवाळी कोणत्या तारखेला होती. यावेळी दिवाळी त्याच तारखेला येत नसते. मागच्या वर्षी गणपती ज्या तारखेला आले त्याच तारखेला या वर्षी गणपती येत नसतात. गणेशोत्सव तिथीनुसार येतो. त्यामुळे शिवजयंतीही तिथीनुसारच साजरी केली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. जन्म दिवस आणि वाढदिवस आपले. महापुरुषांचा तोही छत्रपतींचा जन्म दिवस आपल्यासाठी सण आहे. म्हणून तो सण तिथीने साजरा करायचा, असं राज म्हणाले.

संबंधित बातम्या:

शिवजयंती तिथीनुसारच का साजरी करायची?, राज ठाकरेंनी सांगितलं कारण

यवतमाळच्या शिवभक्तानं घरावरच छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला, आर्णीच्या सचिन भोयर यांची संकल्पना

Maharashtra News Live Update : आताचे शिवसेना पक्षप्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आलेत : नारायण राणे

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.