Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरू, घाटकोपरपासून सुरूवात; मुंबईचं राजकीय वातावरण तापणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा कालच्या सभेत दिला होता. त्यानंतर मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत.

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरू, घाटकोपरपासून सुरूवात; मुंबईचं राजकीय वातावरण तापणार?
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरूImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 1:12 PM

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील (masjid) बेकायदा भोंगे उतरवा अन्यथा आम्ही हनुमान चालिसा लावू असा इशारा कालच्या सभेत दिला होता. त्यानंतर मनसे सैनिक आक्रमक झाले आहेत. घाटकोपरमध्ये मनसे सैनिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (mns) कार्यालयावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू केला आहे. दिवसभर लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसा लावला जाणार असल्याचं मनसेने म्हटलं आहे. विशेष म्हणजे रमजान सुरू झालेला असतानाच मनसेने हनुमान चालिसा सुरू केल्याने मुंबईसह राज्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आम्ही आमच्या कार्यालयावर हनुमान चालिसा सुरू केला आहे. अजानमुळे जर धार्मिक तेढ निर्माण होत नाही तर हनुमान चालिसा सुरू केल्याने वातावरण कसे काय बिघडू शकते? असा सवाल मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

घाटकोपरच्या पश्चिमेकडील चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर लाऊडस्पीकर सुरू करून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हे लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे. हनुमान चालिसा संदर्भात राज ठाकरे यांनी कोणतेही नियम लावले नाहीत. फक्त कालच्या भाषणातील राज यांचं आवाहन ऐकूनच हे भोंगे लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आला आहे.

रोज हनुमान चालिसा वाजणार

दिवसभर हनुमान चालिसा लावण्यात येणार असल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. राज ठाकरे यांचा आदेश. मनसे कार्यकर्ता म्हणून आदेशाचं पालन करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी आजपासून सुरूवात केली आहे. रोज भोंगे वाजणार आहेत. त्यावर हनुमान चालिसा, गायत्री मंत्र, गणपतीची आरतीसह हिंदू धर्माशी निगडीत सर्व आरत्या या ठिकाणी वाजणार आहेत. तणाव कशाला होणार? हा धार्मिक कार्यक्रम आहे. त्यांची अजान होते. त्याने तणाव झाला का? नाही ना? हिंदू धर्माची आरती वाजली तर तणाव का? असा प्रश्नच का? आम्ही आमच्या धर्माचा प्रसार करतो, असं मनसेचे पदाधिकारी महेंद्र भानुशाली यांनी सांगितलं.

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कावरील भाषणातून मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला होता. मशिदीवर भोंगे का? असा सवाल केला होता. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवले तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरू करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. तुमच्या भोंग्यांचा आम्हाला त्रास होतो. धर्म निर्माण झाला तेव्हा भोंगे होते का? असा सवाल त्यांनी केला होता. मी कोणत्याही प्रार्थनेविरोधात नाही. तुम्ही तुमची प्रार्थना जरूर करा. पण त्याचं सार्वजनिक प्रदर्शन नको. युरोपात तरी कुठे भोंगे आहेत? असा सवाल त्यांनी केला होता.

संबंधित बातम्या:

bullet train project: बुलेट ट्रेनचा उपयोग काय?, मुंबईवर प्रेम असेल तर कांजूरची जागा द्या; मुख्यमंत्र्यांकडून मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टवर पुन्हा टीका

‘आज गांधी, नेहरू, आझाद यांच्या सारख्यांवर टीका करण्यात धन्यता मानणारं नेतृत्व’, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल

sharad pawar on kashmir files: गुजरातची हिंसा यापेक्षा भयंकर होती, रेल्वेचा डबा पेटवला, शेकडो मेले; शरद पवारांनी दाखवला भाजपला आरसा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.