‘जिथे भेळ, तिथे खेळ’; गीते, बागुलांच्या शिवसेना प्रवेशावर मनसेचा टोला

भाजपमधून शिवसेनेत आलेले वसंत गीते आणि सुनील बागुल या नेत्यांवर अप्रत्यक्षपणे मनसेने टीका केली आहे. (Mns taunt Vasant Gite and Sunil Bagul after shivsena joining)

'जिथे भेळ, तिथे खेळ'; गीते, बागुलांच्या शिवसेना प्रवेशावर मनसेचा टोला
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 1:48 PM

मुंबई: भाजपमधून शिवसेनेत आलेले वसंत गीते आणि सुनील बागुल या नेत्यांवर मनसेने अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. शिवसेनेत आलेल्या या दोन्ही नेत्यांची वृत्ती ‘खाऊ तिथे, आम्ही जाऊ’, अशी आहे. ‘जिथे भेळ, तिथे खेळ’, असं यांचं राजकारण असल्याचा टोला मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी लगावला आहे. (Mns taunt Vasant Gite and Sunil Bagul after shivsena joining)

बाळा नांदगावकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करून सुनील बागुल आणि वसंत गीते यांच्यावर नाव न घेता टीकास्त्र सोडलं आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिक येथील ‘अतिशय मोठ्या नेत्यांनी’ नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे पक्ष सोडल्याचा दावा केला आहे. मनसेची चलती असताना शिवसेना सोडणारे हेच ते मोठे नेते आहेत. नंतर भाजपची सत्ता आल्यावर मनसे सोडणारेही हेच ते नेते आहेत. आता शिवसेनेची सत्ता आल्यावर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. अशा ‘निष्ठावंत’ नेत्यांवर काय बोलणार?, असा चिमटा नांदगावकर यांनी काढला आहे.

या नेत्यांचे ‘जिथे भेळ, तिथे खेळ’, ‘खाऊ तिथे, आम्ही जाऊ’ अशा प्रकारचं राजकारण सुरू असून त्यांना त्यांचं राजकारण लखलाभ असो. शक्यतो वैयक्तिक शेरेबाजी करणं हे मी राजकीय जीवनात टाळत आलो. परंतु, लोकं आपली पायरी ओळखून राहत नाही, त्यामुळे अशी प्रतिक्रिया स्वाभाविकपणे येते, असं सांगतानाच या नेत्यांना खूप शुभेच्छा आणि एक मैत्रीपूर्ण सल्ला. तो म्हणजे दिल्या घरी तरी सुखी राहा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, दोन दिवासांपूर्वीच गीते आणि बागुल यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने नाशिकचे राजकीय समीकरण बदलणार असल्याचे म्हटलं जात आहे. आगामी काळात गीते आणि बागुल यांच्यावर दिल्या जाणाऱ्या जबाबदारीवही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील असं राजकीय जाणकारांचं मत आहे. (Mns taunt Vasant Gite and Sunil Bagul after shivsena joining)

संबंधित बातम्या:

बागुल, गीतेंच्या प्रवेशानंतर शिवसेनेची भगवी शाल उबदार, तेजस्वी होणार? संजय राऊत म्हणाले…

नाशिक पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची रणनीती, राऊतांचा विश्वासू नेता महानगरप्रमुख

बाळासाहेब सानप पुन्हा भाजपात, काय आहे राजकीय जुगाड?

(Mns taunt Vasant Gite and Sunil Bagul after shivsena joining)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.