MNS : ‘कसला माज’, मेट्रोला फक्त 2 दिवस दिले, बँकानंतर मनसेच आता नवीन टार्गेट
MNS : बँकांमध्ये मराठी कामकाजासाठी आग्रह धरणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता टार्गेट बदललं आहे. मनसेने मुंबई मेट्रोला फक्त दोन दिवस दिले आहेत. मुंबई मेट्रोचा तिसरा टप्पा आता लवकरच सुरु होत आहे.

सध्या मुंबईत मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार सुरु आहे. मेट्रो 3 मार्गावरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 2 अ टप्पा लवकरच सुरु होणार आहे. मुंबई मेट्रो 3 मधील दुसरा टप्पा सुरु होण्याआगोदरचं मुंबईतील मेट्रो स्थानकं मनसेच्या रडारवर आली आहेत. त्यामागे कारण आहे. नुकतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँकांचा कारभार मराठी भाषेतून व्हावा, यासाठी सुरु केलेलं आंदोलन स्थगित केलं. स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहून आंदोलन थांबवण्याची सूचना केली.
राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात बोलतान मनसैनिकांना बँकांचा कारभार मराठीत सुरु आहे की, नाही? ते पाहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मनसैनिक बँकांमध्ये धडकण्यास सुरुवात झाली. काही ठिकाणी खळळ, खट्याक सुद्धा झालं.
काय म्हटलय मनसेनं?
आता मेट्रो 3 च्या टप्यातील मेट्रो स्थानकं मनसेच्या रडारवर येण्यामागे मराठी भाषेचा मुद्दा आहे. मेट्रोच्या सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाबाहेरील फलकावर इंग्रजीमध्ये नाव लिहल्याने मनसेकडून इशारा देण्यात आला आहे. “मेट्रोला मराठीचा द्वेष? तात्काळ फलक मराठी करावा, अन्यथा गाठ मनसेशी” अशा इशारा मनसेने दिला आहे.
कसला माज
मेट्रो प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं आहे. दोन दिवसात त्यांनी नाव बदललं नाही, तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मराठीचा विषय सुरु असताना, मेट्रोला कसला माज दोन दिवसात मराठीत नाव केल नाही तर उत्तर देऊ असं मनसेनं म्हटलं आहे.