मनसे लोकसभेच्या 14 जागांवर निवडणूक लढवणार, संभाव्य उमेदवारांची यादी Tv9 मराठीच्या हाती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीत 14 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादी देखील Tv9 मराठीच्या हाती लागली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मनसेसाठी आगामी निवडणूक फायद्याची ठरते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनसे लोकसभेच्या 14 जागांवर निवडणूक लढवणार, संभाव्य उमेदवारांची यादी Tv9 मराठीच्या हाती
Follow us
| Updated on: Jan 06, 2024 | 9:48 PM

मुंबई | 6 जानेवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षात जोरदार हालचाली घडत आहेत. देशात पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनसे पक्ष जोरदार कामाला लागला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत. याशिवाय राज ठाकरे राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जावून पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. राज ठाकरे यांचं पुणे लोकसभा मतदारसंघाकडेदेखील विशेष लक्ष आहे. राज ठाकरे गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने पुण्याचा दौरा करत आहेत. याशिवाय पुणे लोकसभेच्या जागेसाठी पुण्यातील मनसेचे स्थानिक नेते देखील इच्छुक आहेत. याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु असताना आता मनसेची लोकसभा निवडणुकीसाठीची संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.

मनसे संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी Tv9 मराठीच्या हाती लागली आहे. लोकसभेच्या 48 पैकी 14 जागांवर उमेदवारांची चर्चा झाली असून अंतिम निर्णय मात्र राज ठाकरे घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यापासून वसंत मोरे यांची नावे चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

लोकसभेसाठी मनसेचे संभाव्य उमेदवार

राजू पाटील, कल्याण अभिजीत पानसे, ठाणे बाळा नांदगावकर, दक्षिण मुंबई नितीन सरदेसाई, दक्षिण मध्य मुंबई संदीप देशपांडे, ईशान्य मुंबई संजय तुर्डे, उत्तर मध्य मुंबई गजानन राणे, उत्तर मुंबई वागीश सारस्वत, उत्तर पश्चिम मुंबई सुधीर पाटस्कर, बारामती वसंत मोरे, पुणे वैभव खेडेकर, रायगड दिलीप धात्रे, सोलापूर राजू उंबरकर, चंद्रपूर डॉ. प्रदीप पवार, नाशिक

सध्याच्या राजकीय परिस्थितीचा मनसेला फायदा होणार?

महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राज ठाकरे यांना कदाचित आगामी काळात राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये मोठी फूट पडली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची मते आगामी लोकसभा निवडणुकीत विभागली जाण्याची चिन्हं आहेत. या परिस्थितीत राज ठाकरे कुणासोबत युती करणार? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.