मनसे मराठी भाषेसाठी पुन्हा आक्रमक, मराठी न बोलणाऱ्या तरुणाला दिला मोठा इशारा

मराठी भाषा बोलता येत नाही, मराठी भाषा बोलणार नाही, असं उर्मटपणे बोलणाऱ्या तरुणाला मनसे कार्यकर्त्यंनी धडा शिकवला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी त्या तरुणाकडे जात त्याला मराठी शिकण्याचा इशारा दिला आहे. पुढच्या आठ दिवसात मराठी बोलता आली नाही तर गावी पाठवणार, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला दिला आहे.

मनसे मराठी भाषेसाठी पुन्हा आक्रमक, मराठी न बोलणाऱ्या तरुणाला दिला मोठा इशारा
मनसे मराठी भाषेसाठी पुन्हा आक्रमक, मराठी न बोलणाऱ्या तरुणाला दिला मोठा इशारा
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 4:39 PM

मनसेने पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला आहे. बोरिवलीत पुन्हा एकदा मनसेने मराठी न बोलणाऱ्यांना धडा शिकवला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी दुकानात काम करणाऱ्या तरुणाला मराठी येत नसल्याने त्याचे कान पकडून उठाबशा करायला लावले. मनसे पदाधिकाऱ्यांनी अमराठी तरुणांना मराठी शिकण्यासाठी फक्त आठ दिवसांची मुदत दिली आहे. ९ व्या दिवशी मराठी नाही आल्यास गावी रवाना करणार, असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मुंबईतील बोरिवलीत पुन्हा एकदा मनसेने मराठी न बोलणाऱ्यांना धडा शिकवला आहे. दुकानात काम करणाऱ्या तरुणाने मराठी बोलण्यास आणि शिकण्यास नकार दिल्याने मनसेचे कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या तरुणाला धडा शिकवला. मनसेने तरूणांना 8 दिवसात मराठी शिकण्याची धमकी दिली आहे तसेच, 8 दिवसांत मराठी शिकलो नाही, तर तरुणांना गावात पाठवू, अशी धमकीही मनसे कार्यकर्त्यांनी दिली आहे.

मनसे पक्षाचा विधानसभेत एकमेव आमदार जरी असला तरी पक्षाचे तळागळातील कार्यकर्ते हे एकनिष्ठ आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तरुणांमध्ये क्रेझ आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा मोठा चाहतावर्ग हा मनसे पक्षाकडे आशेने पाहत असतो. कोणतीही अडचण असेल तर अनेकजण मनसे पदाधिकाऱ्यांकडे जावून आपली समस्या मांडतात, असं अनेकदा बघायला मिळालं आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांकडून अनेकदा वेगवेगळ्या प्रकरणावरुन परराज्यातील इसमांना मारझोड करण्यात आली आहे. मनसे मराठी भाषेसाठी आक्रमक आहे. मनसेच्या मराठी भाषेसाठीच्या आंदोलनामुळे मराठीचा प्रचार आणि प्रसारास मोठी मदत झालीय हे वास्तव नाकारता येणार नाही. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी यायला हवी, असा मनसैनिकांचा आग्रह असतो. तो रास्तदेखील आहे. दरम्यान, बोरीवलीतील तरुणाला इशारा दिल्यानंतर तो आठ दिवसात मराठी बोलणं शिकतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.