AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Chalisa | मनसेच्या हनुमान चालिसा रथयात्रेला परवानगी नाकारली, आता मनसेची शिवसेना भवनात हनुमान चालिसा करू देण्याची मागणी

आधी मनसेनं राज्य सरकारला हनुमान चालिसा रथ यात्रा काढू देण्याची परवानगी मागितली होती. पण, राज्य सरकारनं ती परवानगी नाकारली. त्यामुळं मनसेनं शिवसेना भवनात हनुमान चालिका करू द्या, आरती करू द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

Hanuman Chalisa | मनसेच्या हनुमान चालिसा रथयात्रेला परवानगी नाकारली, आता मनसेची शिवसेना भवनात हनुमान चालिसा करू देण्याची मागणी
मनसे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 2:57 PM

मुंबई : मनसेनं हनुमान चालिसा रथ यात्रेचं आयोजनं केलं होतं. पण, राज्य सरकारनं कारवाईचा इशारा दिल्यानंतर ही रथ यात्रा रद्द करण्यात आली. त्यामुळं माहीम विधानसभा क्षेत्राचे मनसेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी नाराजी व्यक्त केली. आता यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी नवी मागणी केली. यामुळं शिवसेना अडचणीत येऊ शकते. या नवीन मागणीनुसानर, शिवसेना भवनात हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आणि आरती करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी किल्लेदार यांनी मुख्यमंत्र्यांना (CM) केली आहे. आधी मनसेनं राज्य सरकारला हनुमान चालिसा रथ यात्रा काढू देण्याची परवानगी मागितली होती. पण, राज्य सरकारनं ती परवानगी नाकारली. त्यामुळं मनसेनं शिवसेना भवनात हनुमान चालिका करू द्या, आरती करू द्या, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.

16 एप्रिल रोजी काय होणार

किल्लेदार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानुसार, शिवसेना भवन हे सर्वांसाठी मंदिर आहे. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं शिवसेना भवन हे सर्व हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. शनिवारी, 16 एप्रिल रोजी हनुमान जयंती सेना भवनातील मातेच्या मंदिरात हनुमान चालिसा आणि आरती करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती किल्लेदार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

हनुमान चालिसासाठी द्वेष का

यशवंत किल्लेदार यांनी रामनवमीनिमित्त हनुमान चालिसा रथ यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेचा प्रारंभ शिवसेना भवन येथून होणार होता. पण, राज्य सरकारनं ही यात्रा रद्द केली. त्यामुळं नाराज झालेल्या किल्लेदार यांनी आता दुसरी मागणी केली आहे. हिंदुत्वासाठी महाआघाडी सरकार एकत्र आलं. मग, हनुमान चालिसा वाजविल्यास कारवाई का करावीशी वाटली, तुम्ही हिंदूत्व सोडले का, हनुमान चालिसासाठी द्वेष का, असे प्रश्न पत्राच्या माध्यमातून किल्लेदार यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले आहेत.

एकतर्फी कारवाईला विरोध

किल्लेदार म्हणतात, आमचा कुठल्याही धर्माला, प्रार्थनेला विरोध नाही. आमचा एकतर्फी कारवाईला विरोध आहे. आम्ही रमजानला मुस्लिम बांधवांच्या घरी जातो. गणेशोत्सवात ते आमच्याकडं येतात. पण, रथ यात्रेला विरोध करणारी कारवाई योग्य नाही. त्यामुळं आता शिवसेना भवनातच आरतीला परवानगी द्या, असं किल्लेदार यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री या पत्राला काय उत्तर देतात हे पहावं लागेल.

NCP’s mission | राष्ट्रवादी काँग्रेसचं मिशन विदर्भ! पश्चिम विदर्भात शरद पवार घेणार शिबिर, जयंत पाटलांची माहिती

Sujat Ambedkar: ‘सुशिक्षित’ असून चालत नाही ‘सुजाण’ सुद्धा असावं लागतं, मनसे, हिंदू महासंघाचा सुजात आंबेडकरांवर निशाणा

Sushil Kumar Shinde: यूपीएच्या अध्यक्षपदासाठी पवारांचे नाव चर्चेत, पण जागा खाली नाहीये; सुशीलकुमार शिंदेंचा टोला

अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.