महाराष्ट्राला 3 लाख 5 हजार कोटी, आरे कारशेडला 1832 कोटी, फडणवीसांकडून ‘सोप्या भाषेत’ अर्थसंकल्प सादर
अर्थसंकल्पात केंद्राने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, हा आरोप धादांत खोटा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. | Devendra Fadnavis
मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पासाठी मोदी सरकारकडून घसघशीत मदत देण्यात आली, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाराष्ट्रासाठी मान्य झालेल्या आणि अर्थसंकल्पात तरतूद झालेल्या प्रकल्पांचे एकूण मूल्य 3 लाख 5 हजार 611 कोटी इतकी आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात केंद्राने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, हा आरोप धादांत खोटा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (BJP leader Devendra Fadnavis elaborate Union budget 2021)
ते बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी आणि घोषणांचा सविस्तर तपशील सादर केला. पूर्वीच्या सरकारच्या काळात मोदी सरकार महाराष्ट्राला प्रत्येकवर्षी पाच ते सातपट जास्त मदत मिळत आहे, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार घाबरल्याचं पाहून आनंद : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद बिनविरोध होतं, निवडणूक होत नाही, पण हे सरकार असं आहे की विरोधी पक्षांशी संवाद करत नाही, विरोधी पक्षांच्या अधिकारांचं हनन करतं, त्याबाबत आम्ही मित्रपक्षांसोबत बसू आणि निर्णय घेऊ. मात्र विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार घाबरलेलं आहे, हे बघून मला आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.
महाराष्ट्राला काय काय मिळालं?
* मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 1832 कोटींची तरतूद
*पुणे मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 3195 कोटींची तरतूद
*नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात 5976 कोटींची तरतूद
*नाशिकमधील रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात 2092 कोटींची तरतूद
*राज्यातील रस्तेबांधणीसाठी एक लाख कोटींपेक्षा जास्त बजेट मिळालं आहे.
*10 हजार किमी पेक्षा जास्त रस्ते बांधले जातील
*मुंबईला पिण्याचं पाणी मिळावं या प्रोजेक्टसाठी 3 हजार कोटी रूपये
*घरोघरी पाणी मिळाव यासाठी 1 हजार कोटी रूपये
*शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 6 हजार 823 कोटी
*रेल्वे प्रकल्पांसाठी 86696 कोटींची तरतुद झालीय, त्यापैकी यावर्षी सात हजार कोटी महाराष्ट्राला मिळाले आहेत.
*बीड परळी रेल्वेमार्गालाही पैसे मिळाले आहेत
*मुंबईच्या लाईफलाईन लोकलसाठी साडे सहा कोटी रूपये दिले
संबंधित बातम्या:
मुंबई-महाराष्ट्रावर अन्याय, स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा अर्थसंकल्प : उद्धव ठाकरे
‘बोतल वही है सिर्फ शराब बदल गई है’, अर्थसंकल्पावर मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया
(BJP leader Devendra Fadnavis elaborate Union budget 2021)