सुनील पाटीलला क्रुझ ड्रग्ज पार्टीची माहिती होती, पाटीलने सॅम डिसूजाला दिली होती माहिती; कंबोज यांचा दावा
सुनील पाटील हा ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला. सुनील पाटील याला ड्रग्ज पार्टीची माहिती होती. ड्रग्ज पार्टीची माहिती सुनील पाटील यानं सॅम डिसुझाला दिली असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला.
मुंबई: भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईतील ड्रग्ज पार्टी आणि पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नांची सरबत्ती केलीय. किरण गोसावी हा सुनील पाटीलचा माणूस असल्याचा दावा कंबोज यांनी केला. सुनील पाटील हा ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला. सुनील पाटील याला ड्रग्ज पार्टीची माहिती होती. ड्रग्ज पार्टीची माहिती सुनील पाटील यानं सॅम डिसुझाला दिली असल्याचा दावा मोहित कंबोज यांनी केला. मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषदेत सॅम डिसुझाचा व्हिडीओ देखील दाखवला. त्यामध्ये सॅम डिसुझाचा व्हिडीओ, सुनील पाटील आणि सॅम डिसुझा यांच्यातील व्हॉटसअप चॅट शेअर करत सुनील पाटीलच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
सुनील पाटीलला ड्रग्ज पार्टीची माहिती
मोहित कंबोज यांनी ड्रग्ज पार्टी प्रकरण हे 1 ऑक्टोबर पासून सुरु होतं. सुनील पाटील यांनी सॅम डिसुझाला 1 तारखेला व्हॉटस अप कॉल केला. माझ्याकडे 27 लोकांची माहिती आहे, एनसीबीशी संपर्क करुन द्या. सुनील पाटीलनं मुंबईत क्रुझ पार्टी होणार असल्याची माहिती दिली. सॅम डिसुझानं व्ही. व्ही. सिंग यांच्याशी संपर्क केला. सॅम डिसुझा यांनी देशासाठी कोणतं काम करायचं असेल तर ती द्यावी म्हणून सिंग यांच्याशी संपर्क केला. मात्र, ड्रग्ज प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीशी संबंधित असणाऱ्या सुनील पाटील यांच्याकडं कशी असा सवाल मोहित कंबोज यांनी केला.
किरण गोसावी सुनील पाटीलचा माणूस
2 ऑक्टोबरला सुनील पाटील यांनी माझा माणूस तुझ्याशी बोलेल असं सॅम डिसुझाला सांगितलं. तो व्यक्ती किरण गोसावी होता. किरण गोसावी संपूर्ण माहिती एनसीबी अधिकारी व्ही. व्ही. सिंग यांना देतील, असं सुनील पाटील यांनी सांगितलं. एनसीपीच्या सदस्यांकडे ड्रग्जची पार्टी कशी होणार याची माहिती कशी आली हा प्रश्न असल्याचं मोहित कंबोज म्हणाले.
नवाब मलिक यांच्यावर अप्रत्यक्ष निशाना
मोहित कंबोज यांनी एक कथित ऑडिओ क्लिप जारी केली त्यामध्ये महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा उल्लेख आढळतोय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गृहमंत्र्याशी संपर्क कसा काय? किरण गोसावी हा सुनील पाटील यांचा व्यक्ती आहे. सुनील पाटील, किरण गोसावी हे मोठमोठ्या लोकांसोबत भेटतात फोटो काढतात आणि सिंडीकेट करतात. एक खोटं प्रकरण उचलून धरण्याचं काम एका मंत्र्याकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे संबंधित मंत्री अधिकाऱ्याचा विरोध करता करता देशाचा विरोध करायला लागला का? असा सवाल मोहित कंबोज यांनी केलाय.
इतर बातम्या:
आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप असणारे सुनील पाटील कोण?; वाचा सविस्तर
कंबोज यांच्या आरोपांनंतर नवाब मलिकांचं ट्विट, उद्या वानखेडे आर्मीचा पर्दाफाश करणार
Mohit Kamboj said Sunil Patil had information of Drugs case