नवाब मलिक म्हणाले, 100 कोटींच्या दाव्याच्या नोटीसची वाट पाहतोय; कंबोज यांनीही पाठवली नोटीस
क्रूज पार्टी ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी थेट नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ही छापेमारी पूर्वनियोजित आणि बनावट असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. (mohit kamboj sent notice to nawab malik over false allegation)
मुंबई : क्रूज पार्टी ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी थेट नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. ही छापेमारी पूर्वनियोजित आणि बनावट असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. इतकंच नाही तर NCB अधिकारी समीर वानखेडे हे भाजप नेत्यांच्या संपर्कात होते, त्यानुसार त्यांनी कारवाई केल्याचा आरोप केला होता. आता तर नवाब मलिक हे भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष मोहित कुंबोज आणि समीर वानखेडे यांच्या कथित भेटीचा व्हिडीओ जारी करणार आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणासंदर्भात मोहित कंबोज यांनी मंत्री नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे..
क्रुझवरील ड्रग पार्टीवर जेव्हा रेड करण्यात आली तेव्हा मोहित कंबोज यांच्या नातेवाईकाला सोडण्यात आले होते, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन केला होता. या प्रकरणी मलिक यांच्यावर 100 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं मोहित कंबोज यांनी सांगितलं होतं. त्यानंतरही मलिक यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला होता. त्यानंतर अखेर कंबोज यांनी मलिक यांना नोटीस बजावली आहे.
मलिक यांचा आरोप काय?
काही लोकं मला 100 कोटींच्या नोटीसा पाठवणार आहेत. त्याची मी वाट पाहत आहे. बऱ्याच कंपन्यांची ब्रँड व्हॅल्यू असते. माझी ब्रँड व्हॅल्यू 100 कोटींची ठरवल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी भाजप नेते मोहीत कंबोज यांच्यावरही टीका केली. कंबोज म्हणाले मलिक हे भंगारवाला आहेत. होय, माझे वडील भंगारचा धंदा करायचे याचा अभिमान आहे. मी कधी कुणाला लुटले नाही. मी बँकेचे पैसे बुडवले नाही. ज्यांच्यावर सीबीआयच्या धाडी पाडल्या ते माझ्या कुटुंबीयाचा धंदा काढत आहेत. मी भंगारचा धंदा करतो. पण आम्ही सोन्यात कुणाला बुडवले नाही, अशी टीका मलिक यांनी केली होती.
कंबोज एनसीबीच्या कार्यालयात गेले होते
युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव आता लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी NCB कार्यालयात गेले होते, त्यांच्यासोबत त्यांचे वडील, त्यांचे काकाही होते, असा दावाही मलिक यांनी केला होता.
मलिक यांची वायफळ बडबड
मलिक यांनी केलेले सर्व आरोप कंबोज यांनी नाकारले होते. समीर वानखेडे कसे दिसतात हेच माहीत नाही तर त्यांना भेटण्याचा प्रश्न येतो कुठे? मी वानखेडेंना भेटल्याचे मलिक यांनी पुरावे द्यावेत. नाही तर दुसऱ्या नोटिशीला तयार राहा. मलिक यांचे जावई ड्रग्ज प्रकरणात अडकलेले आहेत. त्याचा पर्दाफाश झालेला आहे. त्यामुळेच त्यांची आदळआपट सुरू आहे, असा दावा कंबोज यांनी केला होता. ऋषभ सचदेवला सोडण्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. ज्यांच्याविरोधात पुरावे नव्हते त्यांना सोडून देण्यात आले. मलिक हे काहीही बरळत आहेत. ते ड्रग्ज घेऊन तर बरळत नाहीत ना?, अशी खोचक टीकाही त्यांनी केली होती.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 12 October 2021 https://t.co/8TKsCpXHvy #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 12, 2021
संबंधित बातम्या:
NCB अधिकारी समीर वानखेडेंचे कॉल डिटेल्स तपासा, भाजप नेत्यांचे कॉल दिसतील, नवाब मलिकांची आग्रही मागणी
Shah Rukh Khan : NCB ने फास आणखी आवळला, आता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला समन्स धाडलं!
ठाणे-पालघरमध्ये 4 दिवसांत सव्वा सात हजार बाटल्या रक्तसंकलन; अभिनेते शरद पोंक्षेंकडूनही शुभेच्छा
(mohit kamboj sent notice to nawab malik over false allegation)