Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon Update : “बिपोरजॉय” आणणार या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, पण हा मान्सून नसणार

Monsoon and cyclone : जून महिना सुरु झाला अन् शेतकऱ्यांसह सर्वांना मान्सूनची प्रतिक्षा लागली. परंतु मान्सूनला बिपोरजॉयने रोखून धरले आहे. ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता. परंतु अजूनही मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे मान्सूनसाठी अजून वेटींग असणार आहे.

Monsoon Update : बिपोरजॉय आणणार या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, पण हा मान्सून नसणार
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 8:47 AM

अविनाश माने, मुंबई : अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. गेल्या तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग ११ किलोमीटर प्रतितास झाला आहे. हे चक्रीवादळ आता उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असल्याची माहिती आहे. जसं जसं हे चक्रीवादळ पुढे सरकेल तसा पुढील १२ तासांत त्याचा वेग आणखी वाढेल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पूर्वमध्य व लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर मंगळवारी संध्याकाळी चक्रीवादळ “बिपोरजॉय” निर्माण झाले आहे. पुढील २४ तासांत “बिपोरजॉय” पूर्वमध्य अरबी समुद्रात तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता. यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे.

हवामान विभागाचा इशारा

हे सुद्धा वाचा

चक्रीवादळ खोल समुद्रात असल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर फार पावसाची शक्यता नाही, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तरी, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांनी खोल समुद्रात मच्छिमारीसाठी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे. तीन तासांत या चक्रीवादळाचा वेग हा ११ किलोमीटर प्रतितास इतका झाला आहे. पुढील १२ तासात त्याचा वेग आणखी वाढणार आहे.

चार जिल्ह्यांना अलर्ट

काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात ४ जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील ३ ते ४ तासात जळगाव, नाशिक, अहमदनगर, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. परंतु हा पाऊस मान्सून नाही, यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी घाई करु नये.

केरळमध्ये कधी येणार मान्सून

मान्सून अजून केरळमध्ये दाखल झालेला नाही. दरवर्षी १ जून रोजी मान्सून केरळमध्ये येतो. यावर्षी ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार होता. आता 8 जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आग्नेय अरबी समुद्र आणि दक्षिण केरळमध्ये मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय झाला असला, तरी पश्‍चिमेकडून येणाऱ्या प्रवाहाला अजूनही अपेक्षित जोर आणि उंची प्राप्त झालेली नाही.

महाराष्ट्रात कधी येणार पाऊस

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर आठ दिवसांत त्याचा प्रवास महाराष्ट्राकडे होता. यामुळे ८ जून रोजी मान्सून केरळमध्ये आला तर राज्यात सुमारे 15 जूनच्या आसपास पाऊस दाखल होण्याची चिन्हे आहेत. पण, त्याबाबत हवामानशास्त्र विभागाने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.