Monsoon : 25 जूनपासून जोरदार बरसणार, पाहा तुमच्या भागात कोणता अलर्ट

राज्यात यावर्षी सरासरा पेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. यंदा वेळेच्या आधी दाखल झालेला पाऊस नंतर मात्र मंदावला आहे. आता मंगळवारपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे कोणत्या भागात कोणता अलर्ट देण्यात आला आहे. जाणून घ्या.

Monsoon : 25 जूनपासून जोरदार बरसणार, पाहा तुमच्या भागात कोणता अलर्ट
Follow us
| Updated on: Jun 24, 2024 | 7:38 PM

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झालाय. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आता पावसाने जोर धरायला सुरुवात केली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झालाय. आता हवामान खात्याने (IMD) मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता संपूर्ण राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. 25 ते 27 जून दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह इतर सर्व ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नैऋत्य मोसमी पावसाचे ६ जून रोजीच कोकणात आगमन झाले होते. त्यानंतर 8 जूनला पुण्यात आणि 9 जूनला मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मान्सून दाखल झाला होता. मात्र मान्सूनचा वेग मंदावला होता. त्यामुळे उकाड्यापासून सुटका होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. विदर्भात दाखल झाल्यानंतर उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय.

या आठवड्यात मुसळधार पाऊस

राज्यात आता मान्सूनचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल बदल दिसून आला आहे. त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मुसळधार पाऊस बरसणार आहे. राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार मंगळवारपासून मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 25 ते 28 जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.

यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमध्ये देखील यंदा वेळेच्या आधीच मान्सून दाखल झाला होता. पण महाराष्ट्रात आणि मुंबईसह इतर भागात पावसाचा अजूनही जोर दिसत नाहीये. त्यामुळे लोकं पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.