महाराष्ट्रातील जनतेला उष्णतेपासून लवकरच दिलासा, या दिवशी होणार पावसाचं आगमन

Monsoon update : हवामान खात्याने आता एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागात मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. काय आहे ही पावसाची अपडेट जाणून घ्या

महाराष्ट्रातील जनतेला उष्णतेपासून लवकरच दिलासा, या दिवशी होणार पावसाचं आगमन
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 6:45 PM

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या उन्हाचा तडाखा जाणवत आहे. त्यामुळे प्रत्येकाला पावसाची प्रतिक्षा आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे लवकरच तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे. हवामान खात्याने (IMD) मान्सूनबाबत दिलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्रातील जनतेला उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळू शकतो. नैऋत्य मान्सून ३० मे रोजी निर्धारित वेळेआधीच केरळमध्ये पोहोचलाय. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याने (IMD) म्हटले आहे की मान्सून लवकरच इतर राज्यांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

मुंबईत प्री मान्सून पावसाची शक्यता

IMD नुसार, मुंबईसह महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. मुंबईत लवकरच मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबईत 6 जून ते 10 जून दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या माहितीनुसार, हा आठवडा मुंबईसाठी पावसाच्या दृष्टीने चांगला असणार आहे. मान्सून दाखल होण्याच्या आधीच प्री-मॉन्सून पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना थंड हवामानाचा अनुभव मिळणार आहे.

केरळपाठोपाठ कर्नाटक-आंध्र प्रदेशातही मान्सून दाखल झाला आहे. दुसरीकडे दिल्ली आणि इतर उत्तरेतील राज्यांमध्ये तापमान अजूनही गरम आहे. त्यामुळे त्यांना देखील १५ जूनपर्यंत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईत राहणार ढगाळ वातावरण

अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा प्रभाव दिसून येत आहे. त्यामुळे पुढील ३ ते ४ दिवस मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. ढगाळ आकाशामुळे तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. मान्सून वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे मान्सून 15 जूनला गुजरातमध्ये दाखल होईल असे हवामान खात्याने म्हटले आहे.

या आठवड्यात मुंबईत हलका पाऊस पडण्याची शक्यताय. 7 जून रोजी अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुंबईत 7 ते 10 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे.

स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, हा मान्सूनपूर्व पाऊस गोवा-कोकण किनारपट्टीवर पर्यंत मर्यादित राहिल. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडू शकतो. परंतु महाराष्ट्राच्या इतर भागात तो पोहोचणार नाही. गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अलिबाग, मुंबई, ठाणे आणि डहाणू या किनारपट्टीवरील शहरांमध्ये हलका पाऊस होऊ शकतो.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.