Monsoon Update : मुंबईत रात्री पावसाची हजेरी! पुढील 5 दिवस पूर्व मोसमी पावसाचा अंदाज, कुठे पोहोचला मान्सून?
Monsoon Update Today 9 June 2022 Latest News in Marathi: मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलाक पाऊस पडण्याची शक्यताय.
मुंबई : मुंबईकरांना रात्री अल्पसा दिलासा मिळेल, असा पाऊस (Mumbai Rains) झाला. मध्यरात्रीच्या सुमारास मुंबईच्या बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली. त्यामुळे काही काळ वातावरणात गारवा पसरला होता. पूर्व मोसमी पावसाची (Pre monsoon Rains) हजेरी मुंबईत लागल्यानं आता मुंबईकर सुखावलेत. दरम्यान, मान्सूनही आता लवकरच दाखल होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. बुधवारी संध्याकाळनंतर आभाळात काळे ढग दिसून आले होते. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा पाऊस झालाय. या पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळालाय. आता येत्या चार ते पाच दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे राज्याच्या बहुतांश भागात आता पूर्व मोसमी पाऊस (Monsoon Update) हजेरी लावेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
दणक्यात आगमन होण्याची शक्यता…
मान्सून सध्या प्रगतीपथावर आहे. पण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात स्थिती आवश्यक तेवढी अनुकूल नाही, असं दिसतंय. मात्र अरबी समुद्रात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा जेव्हा उत्तरेकडे सरकेल, तेव्हा मान्सूनची वाटचाल अधिक जोमाने होण्यास सुरुवात होईल. ही स्थिती हळूहळू तयारही होतेय. त्यामुळे मान्सून लवकरच दणक्यात आगमन करेल, अशी शक्यता आहे.
Few thunderstorms over ghats & south Raigad but No thunderstorms likely for Mumbai next few hours. Mumbai likely to get thunderstorms at least on couple days till 12-13 June but going to be hit & miss till then. Proper Monsoon rains likely from 14-15 June.
— Mumbai Weather (@IndiaWeatherMan) June 8, 2022
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यताय. दक्षिण मध्य महाराष्ट्रासह कोकण पट्ट्यात आणि घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
Some parts of #NaviMumbai, #Mumbai, #Thane, #Raigad, #Pune to receive scattered rains and tstorms due to wind discontinuity at 850hpa over this region during next 3-4hrs#Mumbairains pic.twitter.com/qWnEHRAA9T
— IndiaMetSky Weather (@indiametsky) June 8, 2022
नाशिक, पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पूर्वमोसवी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तसंच विदर्भातही हलका पाऊश होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
कोकणात लवकरच आगमन…
मान्सूनच्या प्रवाहात बदल होतोय. त्यामुळे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी परिसरात मान्सूनपूर्व सरींना गेल्या दोन दिवसांपासून सातत्यानं हजेरी लावली आहे. कोकणात आता लवकरच मान्सूनचं आगमन होण्याची शक्यताय. दरम्यान, उर्वरीत महाराष्ट्रात पुढीत पाच ते सात दिवस पूर्व मोसमी पाऊस बरसेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे डॉ. अनुपम काश्यपी यांनी दिलीय.
मान्सून कुठे पोहोचला?
मान्सून महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा उशिरानं दाखल होतोय. वर्तवण्यता आलेले मान्सूनचे अंदाज चुकले असले, तरी मान्सूनच भारतातील आगमन वेळेतच झालं होतं. मान्सून सध्या केरळ, कर्नाटकच्या 40 टक्के भागात पोहोचलाय. तर त्यानं तामिळनाडूचा 70 टक्के प्रदेशही व्यापलाय. सध्या मान्सूनचा पाऊस कर्नाटकातील कारवार, चिकमंगरुळ, ईशान्येकडील सर्व राज्य, सिक्किममधील सिलिगुडी, उफहिमालयन बंगाल असा बरसतोय.