AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आईपासून बाळाची झाली होती ताटातूट, पण प्रवाशांनी जे केलं त्याला तोड नाही…

रेल्वेतून उतरता उतरता माय लेकरांची ताटातूट झाली. एका प्रवाशामुळे मात्र त्या दोघा मायलेकारांची पुन्हा गळाभेट झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

आईपासून बाळाची झाली होती ताटातूट, पण प्रवाशांनी जे केलं त्याला तोड नाही...
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 11:33 PM

मुंबईः रेल्वेतील वाढत्या प्रवाशांमुळे अनेकदा ताटातूटीचे प्रसंग मुंबईतील अनेक स्टेशनवर घडले आहेत. मात्र काही प्रवाशांमुळे मात्र ताटातूट झालेल्या वेगवेगळ्या लोकांची पुन्हा एकदा भेट घडवून आणण्यासाठीही मुंबईकरच पुढं सरसावले आहेत. दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान आज एक आई आणि तिच्या बाळाची घटना घडली. आई आणि मुलाच्या या घटनेने रेल्वे स्थानकातील अनेक प्रवाशी मात्र गहिवरले होते. आई अंजू व मुलगा यज्ञेश हे दिवा रेल्वे स्थानकातून रोहा येथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र यावेळी एक गडबड झाली आणि अंजू चुकून पनवेलऐवजी वसईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्या.

त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आपण चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहोत. त्यावेळी ट्रेन दिवा ते अप्पर कोपर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान सिग्नलवर थांबली होती. यावेळी अंजू यांनी मुलासह खाली उतरण्याचा प्रयत्न केला.

रेल्वे सिग्नलजवळ थांबल्यानंतर त्यांनी मुलांसह खाली उतरण्याचा प्रयत्न केला मात्र जवळ मुलं असल्याने त्यांना ते त्यावेळी जमलं नाही. यावेळी सहप्रवासी असलेल्या प्रणित जंगम याला अंजुने मुलाला खाली उतरवण्याची विनंती केली.

त्यावेळी प्रणित तीन वर्षाच्या यज्ञेशला घेऊन खाली उतरलाही मात्र, त्याच वेळी त्यांची ट्रेन सुरू झाली आणि आईपासून लेकरू दूर झाली.

आईपासून मूल वेगळं झाल्यामुळे प्रवाशानेही त्या मुलाला घेऊन त्याच्या आईकडे सोडण्यासाठी चालू लागला. तेही तरुण मुलाला घेऊन रेल्वे रुळातून तासभर चालत कोपर रेल्वे स्टेशनला पोचला. त्या प्रवाशामुळे मात्र मायलेकरांची भेट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

रेल्वे स्टेशनवरील या प्रसंगामुळे अनेक लोकांना मायलेकारांची भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न चालू केले मात्र त्यातील त्या प्रवाश्याने दाखवलेली सतर्कतेमुळे व प्रसंगावधानामुळे ताटातूट झालेल्या आई व मुलाची भेट झाली.

'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर
'पहलगाम'वर बोलताना शाहिद आफ्रिदी बरळला तर ओवैसींकडून तगडं प्रत्युत्तर.
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी
दहशतवाद्यांच्या घरावर 13 ठिकाणी छापेमारी.
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं
पाकिस्तानी नेत्यांनी बकबक..,पाकच्या नेत्यांना असदुद्दीन ओवैसींनी झापलं.
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक
पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तिघांना नालासोपारात अटक.
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम...
पोकळ धमक्या देणाऱ्या भुट्टोच्या कुटुंबाने पाकिस्तानमधून ठोकली धूम....
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?
कराड राजकारण्यांचा लाडका म्हणत अंजली दमानियांची मोठी मागणी काय?.
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार
गुजरातमधल्या 50 पाकिस्तानी हिंदू कुटुंबांचा परत जाण्यास नकार.
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने
पाकिस्तान सरकारला पाकिस्तानी नागरिकही वैतागले; गिलगीटमध्ये निदर्शने.