ST Employee Strike | मोठी बातमी! आझाद मैदानावरील आंदोलनातून बाहेर पडण्याची खोत-पडळकरांची घोषणा, आंदोलनाचा निर्णय कर्मचाऱ्यांवर सोडला

अखेर 15 दिवसांनंतर राज्यातील एसटी कामगारांचं आझाद मैदानावर सुरु असलेलं आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा खासदार सदाभाऊ खोत (MLC Sadakhau Khot) यांनी केलीये. काल परिवहन मंत्री अनिल परब  (Anil Parab) यांनी ऐतिहासिक पगारवाढीची (Big Salary Announcement) घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच होता.

ST Employee Strike | मोठी बातमी! आझाद मैदानावरील आंदोलनातून बाहेर पडण्याची खोत-पडळकरांची घोषणा, आंदोलनाचा निर्णय कर्मचाऱ्यांवर सोडला
ST Bus Strike
Follow us
| Updated on: Nov 25, 2021 | 11:22 AM

मुंबई : अखेर 15 दिवसांनंतर राज्यातील एसटी कामगारांचं आझाद मैदानावर सुरु असलेलं आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा खासदार सदाभाऊ खोत (MLC Sadakhau Khot) यांनी केलीये. काल परिवहन मंत्री अनिल परब  (Anil Parab) यांनी ऐतिहासिक पगारवाढीची (Big Salary Announcement) घोषणा केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच होता. त्यामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांनी बुधवारची रात्रही आझाद मैदानातच काढली. पण, आज यावर तोडगा अखेर निघालाय.

एस.टी. कर्मचारी आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये फूट पडलेली स्पष्ट दिसते आहे. कारण, भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरु असलेलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली आहे. यावेळेस त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकरही होते. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या इतर भागात सुरु असलेलं आंदोलन सुरु ठेवायचं की बंद करायचं याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे असही खोत, पडळकर म्हणालेत.

पगारवाढ हा ऐतिहासिक विजय – सदाभाऊ खोत

“हे जे आंदोलन आहे ते राज्यातील एसटी कामगारांनी सुरु केलं होतं. आम्ही दोन्ही लोकप्रतिनिधींनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. वेळेत पगार दिला पाहिजे, सातवा वेतन आयोगाप्रमाणं वेतन मिळावं, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांची होती. सरकारनं याकडे लक्ष दिलं नव्हतं. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी केली होती. सरकार कामगारांकडे लक्ष देत नव्हतं त्यामुळं आम्ही आझाद मैदानावर ठाण मांडून बसलो. 15 दिवसानंतर सरकारला जाग आली. न्यायालयीन लढा वकील लढत आहेत. न्यायालयीन लढा होईपर्यंत सरकारनं तोपर्यंत पगार वाढवून देण्याचा निर्णय घेतला. हा पहिला टप्पा आहे. 17 हजार पगार मिळणाऱ्या कामगारांना 24 हजारांवर गेला आहे. ज्या कामगारांना 23 हजार मिळत होता त्यांना 28 हजारांपर्यंत पगार मिळणार आहे. ही वाढ मूळ वेतनात होणार आहे. हा कामगारांच्या पहिल्या टप्प्यातील विजय आहे”, असं खोत म्हणाले.

दुसऱ्या टप्प्यात कामगारांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहू – खोत

“राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कमी पडणारी रक्कम देणार आहे. दोन पावलं सरकार पुढं आलं आहे. पहिला टप्पा जिंकलो आहे. न्यायालयातून जो निर्णय येईल. आम्ही दुसऱ्या टप्प्यात कामगारांनी आंदोलन केल्यास आम्ही त्यांच्यासोबत राहू. निलंबन आणि सेवासमाप्ती मागं करण्याचा निर्णय घेतला आहे. आज 12 पर्यंत कामगारांनी कामावर हजर व्हावं, असं सदाभाऊ खोत म्हणाले. हा कामगारांचा मोठा विजय आहे.”

आझाद मैदानातील आंदोलनातही फूट

एस.टी. कर्मचारी आणि सरकार यांच्यात काही चर्चेच्या फेऱ्या झाल्या. त्यातल्या दोन फेऱ्यांमध्ये भाजपचे आमदार पडळकर आणि खोत यांनी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून भाग घेतला. काल जी परिवहन मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यातही हे दोन्ही नेते हजर होते. त्यांच्या उपस्थितीतच पगारवाढीची घोषणा केली गेली. पण घोषणा होताच, आझाद मैदान तसच राज्यभर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पगारवाढीवर नाराजी व्यक्त केली.

कर्मचाऱ्यांचा वाढता रोष पहाता, खोत आणि पडळकर यांनी सावध भूमिका घेत, आज सकाळी निर्णय जाहीर करु असं म्हटलं होतं. त्यानुसारच खोत आणि पडळकर दोघांनीही आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा केलीये. विशेष म्हणजे त्यांनी ही घोषणा आझाद मैदानावर न करता, बाजूला येत पत्रकारांसमोर केली. म्हणजेच आझाद मैदानावरील आंदोलक आणि खोत-पडळकर यांच्यात मतभेद झालेले आहेत आणि सध्या तरी भाजपचे दोन्ही आमदार आंदोलनातून बाहेर पडलेत.

विलिनीकरणावर खोत पडळकरांची भूमिका काय?

राज्यभरातले एस.टी. कर्मचारी हे विलिनीकरणावर ठाम आहेत. त्यामुळेच जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सोडणार नसल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर खोत आणि पडळकर यांच्या भूमिका महत्वाच्या आहेत. दोघांनाही विलिनीकरणाची न्यायालयीन लढाई लढण्याची घोषणा केलीय. समितीचा अहवाल काय येतो तोपर्यंत आहे ते पदरात पाडून आंदोलनाचा पुन्हा निर्णय़ घेतला जाऊ शकतो असं दोन्ही नेते म्हणालेत. म्हणजेच सरकारनं जी विलिनीकरणावर भूमिका घेतलीय तिच्याशी दोन्ही नेत्यांची मिळतीजुळती भूमिका आहे. त्याच मुद्यावर कर्मचाऱ्यांसोबत मतभेद झालेले आहेत. विलिनीकरणाच्या मुद्यावर जर कर्मचारी आंदोलन सुरुच ठेवणार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि आमचा त्यांना पाठिंबा असल्याचेही पडळकर म्हणालेत. पण समितीचा अहवाल येईपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय, संजय राऊतांनी पडळकरांना खडसावलं

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.