महाराज, इतिहास समजून घ्या, ज्योतिरादित्य शिंदेंच्या मराठा स्वाभिमानाला राऊतांचे इतिहासाच्या दाखल्यासह थेट प्रत्युत्तर
MP Sanjay Raut attack on Jyotiraditya Scindia : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्याचे पडसाद अजूनही दिल्लीसह राज्यात उमटत आहे. ज्योतिरादित्य शिंदेंना राऊतांनी असे प्रत्युत्तर दिले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतील सत्कार सोहळ्याने महाविकास आघाडीलाच नाही तर राज्यातील राजकारणाला हादरे बसले. दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणात भूंकप आला. एकनाथ शिंदे यांचा सत्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाल्याने उद्धव ठाकरे गटाचा तिळपापड झाला. त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवसेना फोडणाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याला पवारांनी जायला नको होते, अशी प्रतिक्रिया ठाकरे गोटातून उमटली. त्यावरून राज्यात खळबळ उडाली. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. त्यातच आता केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मराठा स्वाभिमानावरून पुन्हा राळ उडवून दिली. आता हे वाकयुद्ध संपणार की नाही, अशी विचारणा होत आहे.
तुम्हाला मराठा सन्मान काय कळणार?




दरम्यान सत्कार सोहळ्यानंतर उद्धव गट आणि शिंदे गटात शाब्दिक फैरी झडल्या. काल दिवसभर राज्यात त्याचे पडसाद उमटले. तर राष्ट्रवादीतील दोन्ही गटांनी अधूनमधून गोळीबार केला. भाजपाने पण ठाकरे गटावर तोंडसुख घेतले. त्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी पण उद्धव सेनेला खडसावले.
मराठा समाज सब देख रहा है! बाला साहेब ठाकरे के आदर्शों को ठुकराकर, न सिर्फ हिंदुत्व बल्कि मराठा स्वाभिमान का अपमान करने वाले लोग, मराठा सम्मान को क्या समझेंगे?
जो खुद अपने समाज में जनाधार और सम्मान गंवा चुके हैं, वे दूसरों के सम्मान से कष्ट में हैं। https://t.co/ft1izpn3n8
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) February 13, 2025
“मराठा समाज सर्व बघतोय. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श बाजूला सारून न केवळ हिंदुत्वाचा नाही तर मराठा स्वाभिमानाचा अपमान करणारे, मकाय समजतील?”, असा टोला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्वीटमधून हाणला.
महाराज, इतिहास समजून घ्या
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या ट्वीटनंतर ठाकरे गट आक्रमक झाला. संजय राऊतांनी सकाळीच ट्वीट करुन त्याला खरमरीत उत्तर दिले. त्यामुळे हा वाद आजही संपणार नाही असंच दिसत आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांनी थोड्यावेळापूर्वी दिल्लीतून जाहीर नाराजी व्यक्त केली.
Great! महाराज, इतिहास समजून घ्या. वीर महादजी शिंदे हे महान स्वाभिमानी मराठा योद्धा होते.त्यांच्या नावे पळपुट्यांना पुरस्कार देणे हा महादजी शिंदे यांचा अपमान आहे. एकनाथ शिंदे यांना जयाजीराव शिंदे यांच्या नावे पुरस्कार द्यायला काहीच हरकत नाही. महादजी यांनी दिल्ली पुढे लोटांगण घातले… https://t.co/HTivPoO1DM
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 13, 2025
“महाराज, इतिहास समजून घ्या. ज्योतिरादित्यांनी महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. महादजी शिंदे वीर होते. त्यांनी दिल्लीपुढे कधी लोटांगण घातलं नाही. दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकवला नाही. हे जरा आताच्या महाराजांनी समजून घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्याविषयी म्हणणं नाही. कुणाच्या नावाने देताय याला विरोध आहे. तुम्ही महादजी शिंदे यांची प्रतिष्ठा कमी केली आहे. तुम्ही तुमच्या पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करत आहात. एका योद्ध्याची प्रतिष्ठा कमी करत आहे. तुम्ही जयाजीराव शिंदे यांच्या नावाने पुरस्कार द्या. आमचं काही म्हणणं नाही.” असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे.