…म्हणून श्रीकांत शिंदे यांनी मंत्रिपद नाकारलं?; शपथविधीनंतर तर्कांना उधाण
देशाच्या राजधानी असलेल्या दिल्लीमधील राष्ट्रपती भवनमध्ये नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात सात जागांवर यश मिळवलेल्या शिंदे गटाच्या पदरात एक राज्यमंत्रीपद पडलं. त्यानंतर आता श्रीकांत शिंदे यांनी मंत्रीपद का नाकारलं याबाबत राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे.
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली असून शपथविधीचा कार्यक्रम राष्ट्रपती भवनामध्ये सुरू आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला दोन कॅबिनेट तर चार राज्यमंत्रीपद आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यमंत्रीपद नाकारलं असून आम्ही थांबावला तयार असल्याचं म्हटलं आहे. शपथविधी होण्याआधी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आधी आपल्याला मंत्रीपद नको असल्याचं म्हटलं होतं. मात्र शिंदे गटाला एकही कॅबिनेटपद मिळालं नाही. त्यामुळे शपथविधीनंतर राज्यात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
श्रीकांत शिंदेंनी का मंत्रिपद नाकारलं?
महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मानले जाणारे पीयूष गोयल आणि माजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कॅबिनेटपद मिळालं आहे. तर एकनाख शिंदे यांच्या शिवसेनेमधील प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्रिपद मिळालं आहे. तर भाजपच्या रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांना राज्यमंत्रिपद मिळालं असून आरपीआय नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना राज्यमंत्रिपद मिळालं आहे.
एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं आहे. आजही तेच उदाहरण महाराष्ट्राने पाहिलं असून मी तिसऱ्यांदा खासदार झालो. मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो असल्याने सगळ्यांची इच्छा होती की केंद्रात मंत्रीपद मिळायला हवं, पण आता पक्षबांधणीची गरज असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले होते. मात्र आत राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीकांत शिंदे यांना आधी माहिती असणार की शिवसेनेला कॅबिनेटपद मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी आधीच आपल्याला मंत्रीपद नको असल्याचं सांगितलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात सोशल इंजीनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात 27 ओबीसी आणि 10 दलित खासदारांना मंत्री म्हणून संधी दिली आहे. शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्रिपद मिळालं आहे. प्रतापराव जाधव हे बुलढाण्यातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.