MPSC परीक्षार्थींना शनिवारी लोकल प्रवासाची परवानगी, शेलारांच्या पाठपुराव्याला यश
मुंबईत येणाऱ्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. याबाबत भाजप आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
मुंबई : एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा 4 सप्टेंबरला होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा ‘अराजपत्रित गट ब’साठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा आधी 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, मुंबईत येणाऱ्या परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली जात होती. याबाबत भाजप आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. शेलार यांच्या यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे. (MPSC candidates to be allowed local travel on Saturday in mumbai)
4 सप्टेंबर,शनिवारी होणाऱ्या MPSC परिक्षेसाठी उपनगरातील विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याबाबतची विनंती काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे केली. त्यानुसार तातडीने मा. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दूरध्वनीवरुन ही मागणी केली. हॉल तिकीट पाहून रेल्वे तिकीट देता येईल, अशी सकारात्मक भूमिका रेल्वे राज्यमंत्र्यांनी घेतली. मात्र राज्य शासनाचा तसा प्रस्ताव आवश्यक आहे,असेही सांगितले. म्हणून तातडीने राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनीही तत्काळ सकारात्मक्ता दाखवली.
4 सप्टेंबर,शनिवारी होणाऱ्या MPSC परिक्षेसाठी उपनगरातील विद्यार्थ्यांना रेल्वे लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याबाबतची विनंती काही विद्यार्थ्यांनी माझ्याकडे केली. त्यानुसार तातडीने मा. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे दूरध्वनीवरुन ही मागणी केली. 1/3
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 2, 2021
राज्यानं रेल्वेशी संपर्क करण्याची मागणी
आता राज्य शासनाने याबाबत तातडीने रेल्वेशी संपर्क केल्यास शनिवारी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल, अशी मागणी शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे. तसंच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं शेलारांनी रावसाहेब दानवेंचे आभार मानले आहेत.
आता राज्य शासनाने याबाबत तातडीने रेल्वेशी संपर्क केल्यास शनिवारी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
मा. रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे विद्यार्थ्यांतर्फे आभार! 3/3
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 2, 2021
2021 नंतर शिवसेनेची घोषणा बदलली, शेलारांचा टोला
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहीहंडी आणि गणेशोत्सवावर निर्बंध घातले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स सुरु आहे. मात्र, मंदिरं उघडण्याचा निर्णय अद्याप विचारात नसल्याचं महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यांवर जोरदार निशाणा साधलाय. सन 2019 पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, “पहिले मंदिर बादमें सरकार” तर 2021 ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि ” पहिले मदिरालय बाद मे मंदिर!” असा सणसणीत टोला आमदार आशिष शेलार यांनी लगावला.
सन 2019 पर्यंत शिवसेनेची घोषणा होती, “पहिले मंदिर बाद में सरकार” तर 2021 ला शिवसेनेची घोषणा बदलली आणि ” पहिले मदिरालय बाद में मंदिर!” @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ChDadaPatil pic.twitter.com/87xiGm1nv5
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 1, 2021
इतर बातम्या :
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका, नेमकं प्रकरण काय?
सिंधुदुर्गात राणेंना झटका, 2 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश; नितेश राणे म्हणतात ‘येड्यांची जत्रा’!
MPSC candidates to be allowed local travel on Saturday in mumbai