MPSC : एमपीएसीच्या परीक्षेच्या उत्तरसुचीत चुका, लोकसेवा आयोगाकडे विद्यार्थ्यांनी सादर केले पुरावे
उत्तरसुची जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात उमेदवारांनी चुकीच्या उत्तरांबाबत हरकती आणि संदर्भ पुरावे लोकसेवा आयोगाकडे देणे अपेक्षित असते. त्यानुसार काही उमेदवारांनी चुकीच्या उत्तरांबाबत हरकती आणि पुरावे लोकसेवा आयोगाकडे दिल्या आहेत.
मुंबई – 16 एप्रिलला पीएसआयची (PSI) परीक्षा झाली. त्या परीक्षेच्या उत्तरसुचीत प्रश्नांची चुकीची उत्तरे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) परीक्षेची उत्तरसुची जाहीर केली आहे. विशेष म्हणजे उत्तरसुचीत विचारण्यात आलेल्या 100 प्रश्नांपैकी 11 प्रश्नांच्या उत्तरांबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम तयार झाला आहे. कोरोनाच्या (Corona) कालावधीमध्ये झालेल्या परीक्षेला अनेक विद्यार्थी उपस्थित होते. परंतु उत्तरसुची चुकीची होती असा विद्यार्थ्यांनी दावा केला आहे.
उत्तरसुचित चुकीची उत्तरे
मागच्या चार वर्षांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचे नियोजन केले नव्हते. परीक्षा होत नसल्याने वयोवर्यादा ओलाडायला आलेली विद्यार्थी परीक्षेकडे डोळे लावून बसले होते. दहा दिवसापुर्वी पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा घेण्यात आली. शंभर गुणांची प्रश्नपत्रिका होती. त्यामध्ये प्रत्येक प्रश्नांला एक गुण होता. इंग्रजी, मराठी, सामान्यज्ञान विषयावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्यामध्ये काही प्रश्नांची चुकीची उत्तरे असल्याचं विद्यार्थी सांगत आहेत. प्रश्नपत्रिकेत बरोबर प्रश्नांचा पर्याय असताना सुध्दा उत्तरसुचित चुकीची उत्तरे देण्यात आली आहेत. संपुर्ण उत्तरसुचित अकरा प्रश्नांची चुकीची उत्तरे देण्यात आली आहेत.
लोकसेवा आयोगाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष
उत्तरसुची जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात उमेदवारांनी चुकीच्या उत्तरांबाबत हरकती आणि संदर्भ पुरावे लोकसेवा आयोगाकडे देणे अपेक्षित असते. त्यानुसार काही उमेदवारांनी चुकीच्या उत्तरांबाबत हरकती आणि पुरावे लोकसेवा आयोगाकडे दिल्या आहेत. त्यावर लोकसेवा आयोग आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.